विमानात घडलं भयंकर! प्रवाशांनी स्वतःला टॉयलेटमध्ये कोंडलं, एमर्जन्सी लँडिंग

विमानात-घडलं-भयंकर!-प्रवाशांनी-स्वतःला-टॉयलेटमध्ये-कोंडलं,-एमर्जन्सी-लँडिंग

अ‍ॅथेन्स, 08 सप्टेंबर : उंच आकाशात उडणाऱ्या विमानात प्रवाशांच्या किंचाळण्याचा आवाज. सर्वच्या सर्व प्रवासी घाबरते होते. बहुतेक प्रवासी रडत होते. काही जण तर इतके घाबरले की त्यांनी स्वतः स्वतःला विमानाच्या टॉयलेटमध्येच कोंडून घेतलं. अखेर पायलटनेही विमानाचं एमर्जन्सी लँडिंग केलं. लंडनहून ग्रीसला जाणाऱ्या उडत्या विमानात हा असा गोंधळ पाहायला मिळाला. पण असं नेमकं या प्लेनमध्ये घडलं तरी काय?

लंडनहून ग्रीसमध्ये आलेलं एक प्लेन चर्चेत आलं आहे. द सनच्या रिपोर्टनुसार 2 सप्टेंबरला एझीजेट फ्लाइट  लंडनहून ग्रीसच्या गॅटविकला जात होती. या प्लेनमध्ये असं काही घडलं ज्यामुळे प्लेनमधील सर्व प्रवाशी घाबरले आणि रडू लागले. अचानक फ्लाइट डायवर्ट करण्यात आली आणि थेसालोनिकीमध्ये फ्लाटचं एमर्जन्सी लँडिंग करावं लागलं.

प्रवाशांच्या या भीतीचं कारण खरतंर एक प्रवासीच होता. 22 वर्षांच्या तरुणाने विमानात धुमाकूळ घातला. नशेत असलेल्या या प्रवाशाने विमानात गदारोळ माजवला. अँथनी मॅक्सटेड असं या प्रवाशाचं नाव.

हे वाचा – फित कापताच नव्याकोऱ्या पुलाचे 2 तुकडे, उद्घाटन करणारे नेतेही पुलावरून कोसळले; Watch Video

याच प्लेनमधून प्रवास करणारा प्रवासी ज्याने ही घटना प्रत्यक्ष पाहिली त्याने सांगितलं की, अँथनी विमानात दारू मागत होता. पण त्याची मागणी पूर्ण करण्यात आली नाही म्हणून तो संतप्त झाला. मोठमोठ्याने किंचाळू लागला. फ्लाइट अटेंडेटने त्याला शांत कऱण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकलं नाही.  क्रू मेंबर्स आणि इतर सहप्रवाशांनी त्याला नियंत्रित करण्याचा शांत करण्याचा प्रयत्न केला. पण सर्वांना मुक्के मारू लागला. महिलांना लाथाही मारल्या. सर्वांना शिवागीळ करत होता, सर्वांवर थुंकत होता.

अँथनीचं असं रूप पाहून सर्वजण घाबरले. कित्येक प्रवाशी रडायला लागले. तर काहीजण टॉयलेटमध्ये लपून बसले.  अखेर 6 जणांनी अँथनीला पकडून ठेवलं. फ्लाइट लँड झाल्यानंतर अँथनीला पोलिसांनी अटक केली. हा प्रवासी ज्या सीटवर बसला होता, तिथं दारूच्या बऱ्याच बाटल्या सापडल्या आहेत.

हे वाचा – भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची हाणामारी, Video सोशल मीडियावर सुसाट व्हायरल

त्याला कोर्टात हजर केलं. तेव्हा त्याने आपली बाजू मांडताना विचित्र कारण दिलं. त्याने सांगितलं, बऱ्याच कालावधीनंतर तो आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी साइप्रसला जात होता. त्यामुळे त्याच्या मनात थोडी भीती होती.  त्याला कोर्टाने जामीन दिला आहे. पण ग्रीसच्या कोर्टात त्याला सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *