विनापरवानगी फोटो शेअर करणाऱ्या त्या ब्रँडवर चांगलीच भडकली अनुष्का शर्मा

मुंबई, 19 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या नव्या सिनेमामुळे चर्चेत आहे. अनुष्का सोशल मीडियावर सक्रीय असते. अनुष्का नेहमीत हसतमुख असते. मात्र तिला राग येणं ही फार दुर्मिळ बाब आहे. अनुष्काला कधीच चाहत्यांनी रागात पाहिलेलं नाही. पण नुकतीच अनुष्कानं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात ती चांगलीच भडकल्याचं दिसत आहे. अनुष्का मागच्या काही दिवसांपासून चकदा एक्सप्रेस या सिनेमानिमित्त सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट शेअर करताना दिसतेय. पण तिनं आज शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिनं एका प्रसिद्ध ब्रँडवर चांगलीच आगपाखड केली आहे.
अनुष्का शर्मा नेहमीच सोशल मीडियावर तिचं मतं खुलेपणानं मांडत असते. काही दिवसांआधीच अनुष्कानं पती विराटला वैयक्तिक गोष्टीवरून बोलल्यानं चांगलेच खडेबोल सुनावले होते. पण यावेळी अनुष्कानं पुमा या प्रसिद्ध ब्रँडच्या पोस्टवरून चांगलाच राग व्यक्त केला आहे. पुमा ब्रँडनं अनुष्काचा फोटो तिच्या परवानगी शिवाय वापरल्यानं अनुष्का चांगलीच चिडली आहे. तिनं इन्स्टाग्रामवर पुमाची ती पोस्ट शेअर करत चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
हेही वाचा – Ranveer-Deepika In FIFA : अर्जेंटिना जिंकताच दीपिकाने रणवीरला मारली मिठी, तो म्हणाला खरी ट्रॉफी तर…
अनुष्काचा फोटो तिच्या परवानगी शिवाय शेअर केल्यानं पुमाची ती पोस्ट शेअर करत म्हटलंय, हेय पुमा इंडिया? मला माहिती आहे की तुम्ही तुमच्या पब्लिकसिटीसाठी माझा फोटो वापर आहात. पण फोटो वापरण्याआधी तुम्ही माझी परवानगी घ्यायला हवी कारण मी तुमची ब्रँड अँबेडेसर नाहीये. कृपया ही पोस्ट काढून टाका.
परवानगीशिवाय फोटो शेअर केल्यानं अनुष्कानं राग व्यक्त केल्यानंतरही पुमा इंडियानं अनुष्काचा फोटो त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर केलेला नाही. फोटो काढून टाका असं सांगूनही पुमाच्या सोशल मीडियावर अनुष्काची पोस्ट दिसत आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं तर अनुष्काचा चकदा एक्सप्रेस हा सिनेमा 2023मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात भारतीय क्रिकेटमधील सर्वात जलद महिला गोलंदाज झूलन गोस्वामी यांचा जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.