विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी, पुणे जिल्ह्यातील घटनेचा VIDEO

विद्यार्थ्यांच्या-दोन-गटात-तुफान-हाणामारी,-पुणे-जिल्ह्यातील-घटनेचा-video

पुणे, 29 डिसेंबर : अनेकदा क्षुल्लक कारणावरून झालेला वाद सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. यातही कॉलेज भांडणाचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. कधी बॉयफ्रेंडवरून, तर कधी जेलसीवरून तर कधी रस्त्यावर ही भांडण पाहायला मिळतात. अशातच कुणी भांडणाचा व्हिडिओ काढून सोशल मिडीयावर टाकल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला आहे.

साऊथ चित्रपटात सुध्दा पाहायला मिळणार नाही अशी दौंड तालुक्यातील वरवंड मधील  विद्यार्थांची तुफान हाणामारी दोन गटात झाली आहे. शाळा आणि महाविद्यालयामधील एका गटाने दुसऱ्या गटाच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केले.

हे ही वाचा :  Shocking: मगरींनी भरलेल्या पुलमध्ये चिमुकल्यानं मारली उडी, पुढे जे घडलं ते… Video Viral

आजूबाजूच्या नागरिकांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला तरीही विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी सुरू होती. त्यामुळे ही मुलं शाळेत शिकायला जातात की हाणामारी करायला जातात असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिकमध्येही तरुणींच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल

नाशिकच्या एका नामांकित कॉलेजमध्ये मुलींची फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. आज सकाळपासून फेसबुक, व्हाटसप वर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून छोट्या गोष्टींवरून झालेले हे भांडणं विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा : आजीला घेऊन चिमुकल्यानं पळवली वाऱ्याच्या वेगानं बाईक आणि… व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या एका कॉलेजमध्ये हा तुफान राडा झाला आहे. यात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणीची त्रेधातिरपीट उडाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तर व्हिडीओत दिसणाऱ्या दुसऱ्या दोघी एकमेकींच्या झिंज्या उपटत असताना दिसत आहे. तर दुसरीकडे सकाळची वेळ असल्याने कॉलेजचा हजारो विद्यार्थ्यांचा गराडा या तरुणींचे भांडण  पाहत व्हिडीओ काढत असल्याचे दिसते आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *