विद्यार्थिनीने शाळेला दांडी मारली म्हणून कोर्टात गेलं प्रकरण; पालकांना शिक्षा

विद्यार्थिनीने-शाळेला-दांडी-मारली-म्हणून-कोर्टात-गेलं-प्रकरण;-पालकांना-शिक्षा

लंडन, 30 सप्टेंबर :  माझं पोट दुखतं आहे, मला बरं नाही वाटत आहे, मला कंटाळा आला आहे, असं काही ना काही कारण देऊन कित्येक मुलं शाळेत जाणं टाळतात. तुम्हीही कधी ना कधी शाळेला दांडी मारली असेल. शाळेत न कळवता सुट्टी घेतली आणि दुसऱ्या दिवशी शाळेत गेलं की शिक्षा होते. पण ही शिक्षा शाळेतील शिक्षक शाळेतच विद्यार्थ्यांना देत असत. पण सध्या असं प्रकरण चर्चेत आलं आहे, ज्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत.

शाळेतील विद्यार्थिनीच्या सुट्टीचं प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं आहे. आश्चर्य म्हणजे मुलीने शाळेला मारलेल्या दांडीची शिक्षा चक्क तिच्या आईला झाली आहे. हे अजब प्रकरण आहे लंडनमधील.कोरोना महासाथीनंतर बऱ्याच महिन्यांनी शाळा-कॉलेज सुरू झाले. पण काही मुलांना आता शाळेत जाण्याची भीती वाटते आहे किंवा कंटाळा येतो आहे. अशाच मुलांपैकी एक असलेली लंडनमधील ही 14 वर्षांची मॅसी. जिला आता शाळेत जायचं नाही. कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली आणि कोर्टाने पालकांना याची शिक्षा दिली.

हे वाचा – बिल्डिंगवरून कोसळला चिमुकला, वाचवायला मागोमाग आईही गेली आणि…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

ब्रिटिश मीडियाशी बोलताना नताशाने सांगितलं की कोरोनानंतर मैसी नीट शाळेत जात नाही आहे. तिला शाळेत जायचंच नाही आहे. मी काय करू? ती शाळेत जायला तयार व्हावी म्हणून मी खूप प्रयत्न करते. पण शाळेच्या नावावर ती सॉरी म्हणते. ती चिंता आणि डिप्रेशनने ग्रस्त आहे. शाळेत जायचं नाव काढताच ती खूप घाबरते.

लंडन मॅजिस्ट्रेट कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली. कोर्टाने तिची आई नताशा ब्युबोइसला दंड ठोठावला. 20 पाउंड म्हणजे जवळपास साडेदहा हजार रुपयांचा हा दंड आहे.

मुलांनी शाळेत जावं ही पालकांची जबाबदारी आहे मला माहिती आहे. पण जर त्यांना जायचंच नसेल तर तुम्ही काय करू शकता? शाळेने मदतीसाठी काहीच केलं नाही. त्यामुळे आईवडिलांना दंड ठोठावलं जाणं हे चुकीचं आहे, असं नताशा म्हणाली.

मुलं शाळेत जाण्यास का देतात नकार?

आपल्यासाठी हे प्रकरण अजब असलं तरी मुलांनी शाळेत जाण्यास नकार देणं हे मात्र बऱ्याच घरात दिसून येतं. मुलांच्या अशा वागण्यामागे काही कारणं आहेत.

पालकांपासून दूर जाण्याची भीती

उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर किंवा कोणत्याही सुट्टीनंतर मुलं असंच वागतात. घरी पालकांसोबत जास्त वेळ घालवल्यामुळे मुलांना त्यांच्यापासून दूर राहायचे नसते. त्यामुळे मुले शाळेत जाण्यास नकार देतात. मुलांच्या अशा वागण्याला सेपरेशन अॅन्झायटी डिसऑर्डर म्हणतात. ज्यामुळे मुलांना त्यांच्या पालकांसोबत घरी सुरक्षित वाटते.

सामाजिक भीती

कधीकधी मुलांना इतरांसोबत असण्याबद्दल असुरक्षित वाटते. त्यांना सोशल फोबिया असू शकतो. नवीन शिक्षक, नवीन मित्र किंवा नवीन व्हॅन ड्रायव्हर हे सर्व त्या मुलासाठी अनोळखी असतात. ज्यांच्यासोबत मुलांना असुरक्षित वाटू शकत नाही. मुलाची ही सामाजिक भीती कमी करण्यासाठी पालकांनी मुलाला नवीन लोकांशी संवाद साधण्यास आणि बोलण्यास शिकवणे आवश्यक आहे.

शाळेतील वाईट अनुभव

मुलांना शाळेत अनेक अनुभव येतात. त्यात काही चांगले आणि काही वाईट असू शकतात. शाळेत आलेला वाईट अनुभव मुलांच्या मनात घर करून राहतो आणि त्यामुळे मुलं शाळेपासून दुरावायला लागतात. वर्गातील इतर मुलांकडून धमकावणे, शिक्षकांचे रागावणे ही अनेक कारणे आहेत जी मुलांना अस्वस्थ करू शकतात. त्यामुळे मुलांना शाळेत जाताना पोटदुखी, छातीत दुखणे आणि कोरडेपणा या समस्या जाणवतात.

हे वाचा – 21 वर्षीय तरुणाने काढला असा Selfie; पाहून पोलीसही हादरले, ताबडतोब केली अटक

व्हेरी वेल फॅमिली नुसार, मुलांचे असे वागणे काहीतरी दाखवत असते. पालकांनी मुलांची ही वृत्ती गांभीर्याने घ्यावी. मुले अशी नियमितपणे वागल्यास त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. अशा वेळी मुलांना रागावण्याऐवजी देण्याऐवजी त्यांच्याशी बोला आणि शाळेत न जाण्यामागचे कारण शोधा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *