विकी कौशलला पहिल्यांदा पाहिल्यानंतर कतरिनाला पडला होता 'हा' प्रश्न; वाचून म्हणाल

विकी-कौशलला-पहिल्यांदा-पाहिल्यानंतर-कतरिनाला-पडला-होता-'हा'-प्रश्न;-वाचून-म्हणाल

मुंबई, 09 डिसेंबर :  कतरिना कैफ आणि विकी कौशल  हे बॉलीवूडमधील क्यूट कपल आहे. सगळीकडे यांचीच चर्चा होते. अनेकांना तर कतरिना-विकीचं जुळलं कसं, कधी यावर अगदी आतापर्यंत प्रश्न पडताना दिसत आहेत.  गेल्या वर्षी याच दिवशी दोघांचे लग्न झाले होते. आज हे लव्ह बर्ड्स लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. कतरिना कैफ आणि विकी कौशलची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे, दोघांनीही लग्न होईल असं कधीच वाटलं नव्हतं. पण आज दोघेही आयुष्यात एकमेकांसोबत खूपच खुश आहेत. आज त्यांच्या हटके लव्हस्टोरीविषयी जाणून घ्या.

दोघांच्या  प्रेमकहाणीला  करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमधून सुरुवात झाली. विकी जेव्हा करणच्या शोमध्ये दिसला तेव्हा करणने त्याला सांगितले की कतरिनाला त्याच्यासोबत काम करायचे आहे. कारण दोघेही ऑनस्क्रीन एकत्र चांगले दिसतील असं तिला वाटतं. तेव्हा हे ऐकून विकीच्या आनंदाला पारावार उरला नाही, तो जवळजवळ बेशुद्धच झाला.

हेही वाचा – Dev Joshi: बालवीर फेम अभिनेता देव जोशी घेणार चंद्रावर झेप; ‘या’ मिशनमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व

त्यानंतर हे दोघे एका अवॉर्ड शो मध्ये भेटले होते. तिथेही दोघांची नजरानजर झाली. पण तेव्हा विकी कौशलने चेष्टेत कतरिनाला ‘माझ्याशी लग्न करशील का?’ असं विचारलं होतं. त्यानंतर काही काळातच खरंच या दोघांनी लग्नगाठ बांधली. हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला होता.

कतरिनाला विकी कौशलविषयी माहित देखील नव्हते. याविषयी कतरिना म्हणाली होती, ”मला आठवतंय की आनंद एल राययांनी मला मनमर्जियां चित्रपटाचा प्रोमो दाखवला होता आणि विकीला पाहून मी विचार करत होतेकि, ‘हा अभिनेता नक्की कोण आहे?!’ तेव्हा मला वाटलं वाह! तो इतका उत्स्फूर्त आणि वास्तविक अभिनय करत होता. तेव्हा त्याचं मला कौतुक वाटलं होतं.”

याविषयी पुढे बोलताना  कतरिना म्हणाली होती कि, ”विकी माझ्या रडारवर कधीच नव्हता. मी नुकतेच विक्कीचे नाव ऐकले होते आणि मला त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. आमची ना कधी भेट झाली ना कधी बोलणं झालं. पण झोया अख्तरच्या पार्टीत जेव्हा आम्ही  भेटलो तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडले.”  झोयाच्या पार्टीनंतर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नसोहळ्याला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. त्यांनी लग्नानंतर रिसेप्शनही केलं नव्हतं. इतर सेलिब्रिटींप्रमाणे ‘बिग-फॅट वेडिंग’ न करता विकी आणि कतरिनाने कुटुंबीय आणि मोजक्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थित लग्न केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *