वरळीत भ्रष्टाचाराची 'खोली' वाढली! लॉकडाऊनमधल्या अनधिकृत कामाला वरदहस्त कुणाचा?

वरळीत-भ्रष्टाचाराची-'खोली'-वाढली!-लॉकडाऊनमधल्या-अनधिकृत-कामाला-वरदहस्त-कुणाचा?

वरळीत भ्रष्टाचाराची ‘खोली’ वाढली! ‘लॉकडाऊन’मध्ये एका रात्रीत अनधिकृत बांधकाम, वरदहस्त कुणाचा?

मुंबईत पुन्हा भ्रष्टाचाराची चर्चा सुरू झालीय. वरळीतल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेनं केलाय.

मुंबईत पुन्हा भ्रष्टाचाराची चर्चा सुरू झालीय. वरळीतल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेनं केलाय.

मुंबईत पुन्हा भ्रष्टाचाराची चर्चा सुरू झालीय. वरळीतल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेनं केलाय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 15 डिसेंबर : मुंबईत पुन्हा भ्रष्टाचाराची चर्चा सुरू झालीय. वरळीतल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेनं केलाय. तसंच स्थानिक आमदारांचा भ्रष्टाचाराला आशीर्वाद असल्याचा दावाही मनसेनं केलाय.

जांभोरी मैदानातल्या कामगार कल्याण केंद्र आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यालय परिसरात अनेक अनधिकृत खोल्या रात्रीतून बांधण्यात आल्या आहेत. लॅाकडाऊनच्या काळात हे अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप मनसेनं केलाय. बीडीडी चाळीच्या आजूबाजूला 2 बाय 2 फुटाचे अनधिकृत गाळे बांधून विकण्यात आले. या गाळ्यांना जागेवर दाखवून त्या बदल्यात फ्लॅट मिळवण्याचा हा घोटाळा असल्याचा आरोप केला जातोय. वरळी बीडीडीत असे शेकडो अनधिकृत गाळे बांधले गेल्याचा आरोप मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केला आहे.

स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आणि सुनील शिंदे यांचा या अनधिकृत कृत्याला आशीर्वाद आहे. अनधिकृत खोल्या अधिकृत करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा थेट आरोप मनसेनं केलाय.

तर मनसेच्या या आरोपांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जोरदार समाचार घेतलाय. बेफाम आरोप करण्यात मनसेचा हात कुणीही धरू शकत नाही, असा टोला ठाकरे गटानं लगावलाय.

2 बाय 2च्या या खोल्या काही तरी काळंबेरं झालं आहे, हे सांगण्यासाठी पुरेशा आहेत. या खोल्या बांधण्यामागे कुणाचा हात आहे? हे तपासात समोर येईलच. या प्रकरणात कारवाई झाली तरच भ्रष्टाचाऱ्यांवर जरब बसेल.

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Aaditya Thackeray, MNS, Shivsena

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *