लोहटा येथे कोव्हीड जन जागरणासाठी रक्तदान शिबीर संपन्न

लातूर

 

औसा:-तालुक्यातील लातुर-उस्मानाबद जिल्हा सिमेलगतच्या लोहटा या छोटेखानी गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत लोहटा च्या आवाहनाला साथ देत रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते• या शिबीरास गावातील शेतकरी सहकारी सोसायटी लोहटाच्या आयोजन सहाय्याने पंचेवीस रक्तदात्यांनी रक्तदान करून ग्रामीण भागातील कुटुंबांना माझे आरोग्य माझा गाव ची संकल्पना स्पष्ट केली• प्रथमत: कोरोना काळात प्रत्येकानी आरोग्याची कशी खबरदारी घ्यावी या विषयावर सरपंच सौ वैशाली राजेंद्र गुंड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले• त्या नंतर दत्ता जाधव,रविकिरण चव्हाण,गोविंद साळवे,प्रथमेश फत्तेपुरे,महेश चव्हाण,शिवाजी बंडगर आदिंनी रक्तदान केले• बालाजी फत्तेपुरे यांनी रक्तदान शिबीराच्या यशस्वितेसाठी काम केले•गणेश चव्हाण यांनी रक्तदात्यांचे आभार मानले •

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *