लोकशाहीची हत्या होते म्हणणारे सभागृहात केवळ 46 मिनिटं होते ; फडणवीसांनी विरोधकांची बोलतीच बंद केली….

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर लोकशाहीच्या मुद्यावरून सरकारवर हल्लाबोल केला होता.
नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल सुरू केला होता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावार आरोप-प्रत्यारोप होऊन कर्नाटक विरोधात ठराव मांडून कर्नाटकचा निषेधही नोंदवण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या प्रमाणे हजेरी लावली त्याच प्रमाणे त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोलही केला होता.
महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर लोकशाहीच्या मुद्यावरून त्यांनी जोरदार टीका केली होती. लोकशाहीच्या मुद्यावरून ज्या उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती.
तोच मुद्दा धरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, लोकशाहीबाबत बोलणारे सभागृहात फक्त 46 मिनिटं होते. यावरून लक्षात येते की, या लोकांना लोकशाहीचा कळवला या लोकांना किती आहे ते दिसून येते असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर लोकशाहीच्या मुद्यावरून सरकारवर हल्लाबोल केला होता.
यावेळी त्यांनी हे लोकशाही विरोधी सरकार आहे. या सरकारमध्ये लोकशाही पाहिली जात नाही अशा जोरदार टीका केली जात होती. मात्र लोकशाहीवर बोलणारे सभागृहात आणि वरच्या सभागृहामध्ये 46 मिनिट फक्त उपस्थित होते असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी सरकारवर टीका केली असली तरी शेवटच्या दिवशी मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ज्या ज्या लोकांनी लोकशाहीवरून टीका केली होती. ते स्वतः किती वेळ सभागृहात हजर होते यावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे ज्यांनी टीका केली त्यांच्यापेक्षा आपण कशी आणि किती लोकशाही मानणारे आहोत हेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.