लाईव्ह सामन्यामध्ये Virat kohli ने लगावले भोजपुरी गाण्यावर ठुमके, Video तुफान व्हायरल

आता पुन्हा एकदा विराट कोहलीचा एक खास डान्स (Virat Kohli Bhojpuri Dance Viral) व्हायरल होतोय. विराटच्या चाहत्यांना (Virat Fans) त्याचा हा डान्स फार आवडला आहे.
Updated: Dec 15, 2022, 08:47 PM IST
Virat kohli dance viral on Bhojpuri song : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) नेहमी त्याच्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. मात्र मैदानाच्या बाहेर विराट तितक्याच मजा-मस्तीच्या (Virat Fun Mood) मूडमध्येही दिसून येतो. यापूर्वी अनेकदा विराट कोहलीची मस्ती कॅमेरात कैद झाली आहे. तर आता पुन्हा एकदा विराट कोहलीचा एक खास डान्स (Virat Kohli Bhojpuri Dance Viral) व्हायरल होतोय. विराटच्या चाहत्यांना (Virat Fans) त्याचा हा डान्स फार आवडला आहे.
विराट कोहली (Virat Kohli) सध्या बांगलादेशाच्या (Ind vs Ban) दौऱ्यावर आहे. बांगलादेशात पहिली टेस्ट मॅच सुरु आहे. तर पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लाईव्ह सामन्यात विराट कोहली चक्क डान्स करताना दिसला. सध्या सोशल मीडियावर एक भोजपुरी गाणं व्हायरल होतंय. याच गाण्यावर विराट कोहलीने ठुमके लगावले आहेत.
Virat Kohli विचित्र डान्स झाला व्हायरल
बांगलादेशाच्या चट्टोग्राम स्टेडियममध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये 2 टेस्ट सामन्यांची सिरीज सुरु आहे. 15 डिसेंबर रोजी पहिल्या टेस्ट सामन्याचा दुसरा दिवस सुरु होता. या दिवशी विराट फार चिल मूडमध्ये दिसून आला. या मूडमध्ये तो आनंदाने डान्स करताना कॅमेरात कैद झालाय.
विराट कोहलीचे डान्स मूव्ह्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही टीम्स लंच ब्रेकवर असताना विराट कोहली काही खेळाडूंसोबत मैदानात उतरला होता. दरम्यान याचवेळी विराट कोहली आनंदाने डान्स करत होता. ‘पतली कामरिया मोरी हाय हाय’या गाण्यावर विराटने चांगलेच ठुमके लावले आहेत.
Virat Kohli moves during lunch break #Viratkohli pic.twitter.com/OzQJPp8VaF
— Adnan Ansari (@AdnanAn71861809) December 15, 2022
बांगलादेशाविरूद्ध Virat Kohli ची बॅट शांत
बांगलादेशाविरूद्धचा पहिला टेस्ट सामना 14 डिसेंबर रोजी सुरु झाला. टीम इंडियाने टस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीमची सुरुवात चांगली झाली नाही. अशातच विराट कोहली देखील केवळ 1 रनवर आऊट झाला. मात्र श्रेयस अय्यर आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सावरला.