लग्नानंतर एकमेकींपासून दूर गेल्या 2 मैत्रिणी; शेवटी घेतला इतका अजब निर्णय की…

कराची 12 सप्टेंबर : सध्या पाकिस्तानमध्ये होणाऱ्या लग्नाच्या बातम्यांची बरीच चर्चा आहे. नुकतंच एका डॉक्टरने सफाई कामगाराशी लग्न केलं होतं, तर काही दिवसांपूर्वी एका महिलेनं तिच्या घरात काम करणाऱ्या नोकराशी लग्न केलं होतं. यानंतर आता पाकिस्तानातील आणखी एक अनोख्या लग्नाची चर्चा सगळीकडे रंगली आहे. यात दोन महिलांनी एकाच तरुणाशी लग्न केलं आहे. दोन महिलांचं एकाच तरुणाशी लग्न करण्याचं कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
तब्बल 8 वर्षांनी झाली आई-मुलाची भेट, VIDEO पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
हे संपूर्ण प्रकरण पाकिस्तानातील मुझफ्फरगडचं आहे. ज्यात दोन महिलांनी एका पुरुषाशी लग्न केलं आहे. दोन्ही महिला एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि त्यांची मैत्री तुटू नये म्हणून त्यांनी एकाच व्यक्तीशी लग्न केलं. एका महिलेचं नाव शहनाज आहे, तर दुसऱ्या महिलेचं नाव नूर आहे. आधी शहनाजने तरुणाशी लग्न केलं आणि यामुळे ती तिची मैत्रीण नूरपासून दूर गेली.
डेली पाकिस्तान ग्लोबर या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, यादरम्यान नूर अनेकदा शहनाजच्या घरी जायची. दरम्यान, दोघांनी एकत्र राहण्याचा प्लॅन बनवला आणि नूरने शहनाजच्या पतीसोबत लग्न केलं. या घटनेबाबत सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. नुकतंच पाकिस्तानमध्ये एका एमबीबीएस महिलेनं रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याशी लग्न केल्याची घटनाही समोर आली होती.
भारतीय समजून पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात पडली रशियन तरुणी, सत्य समजताच घडलं असं काही….
विशेष म्हणजे महिला डॉक्टरने स्वतः त्या व्यक्तीला प्रपोज केलं होतं. नवविवाहित जोडपं पाकिस्तानातील ओकारा जिल्ह्यातील दिपालपूर येथील आहे. महिला डॉक्टरचं नाव किश्वर साहिबा असून तिच्या पतीचं नाव शहजाद आहे. दोघंही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत यूट्यूबवर स्वतःचा ब्लॉग बनवत राहतात. त्या महिला डॉक्टरने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मला त्याचं व्यक्तिमत्त्व खूप आवडलं. जेव्हाही तो माझ्याशी बोलायचा तेव्हा त्याची मान खाली असायची आणि त्यांना पाहून कधीच वाटलं नाही की हा सफाई कामगार किंवा चहावाला आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.