लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी कतरिना आणि विकी पोहोचले हिल स्टेशनवर, पाहा पोस्टमध्ये काय स्पेशल?

लग्नाचा-पहिला-वाढदिवस-साजरा-करण्यासाठी-कतरिना-आणि-विकी-पोहोचले-हिल-स्टेशनवर,-पाहा-पोस्टमध्ये-काय-स्पेशल?

विशेष म्हणजे आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी विकी आणि कतरिना खास हिल स्टेशनला पोहचले आहेत

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. राजस्थानमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. लग्नातील काही खास फोटो विकी आणि कतरिना यांनी आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले होते. आता दोन दिवसांमध्ये यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होते. विशेष म्हणजे आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी विकी आणि कतरिना खास हिल स्टेशनला पोहचले आहेत. नुकताच कतरिनाने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले.

कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नाच्या काही दिवस अगोदर एकमेकांना डेट करत होते. दोघे कायमचसोबत स्पाॅट व्हायचे. चाहते या दोघांच्या लग्नाची वाट देखील पाहत होते. शेवटी दोघांनी 9 डिसेंबरला राजस्थानमध्ये लग्न केले.

विकी आणि कतरिना लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे सेलिब्रेट करण्यासाठी खास ठिकाणी पोहोचले आहेत. कतरिनाने या खास ठिकाणचे काही फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले.

कतरिनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय. विशेष म्हणजे कतरिनाचे हे फोटो विकी काैशल याने क्लिक केले आहेत. काही दिवसांपूर्वी कतरिना हिने करवा चाैथचे व्रत देखील विकीसाठी ठेवले होते.

सतत चर्चा सुरू आहे की, कतरिना कैफ ही प्रेग्नेंट आहे. परंतू यावर अजून विकी किंवा कतरिना यांनी काहीच भाष्य केले नाहीये. सातत्याने चाहते यांना यावर प्रश्न विचारताना दिसत आहेत.

कतरिनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या मागे पहाड दिसत असून हे सुंदर हिल स्टेशन दिसत आहे. कतरिनाच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करून हे कोणते हिल स्टेशन आहे, हे विचारताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *