रोड टॅक्सचं नो टेन्शन! Hyundai Creta फक्त 7.5 लाख रुपयात, कसं ते जाणून घ्या

रोड-टॅक्सचं-नो-टेन्शन!-hyundai-creta-फक्त-7.5-लाख-रुपयात,-कसं-ते-जाणून-घ्या

Hyundai Creta: ह्युंदाई क्रेटा एक लोकप्रिय एसयूव्ही असून या सेगमेंटमध्ये सर्वाधिक मागणी असलेली गाडी आहे. या गाडीची किंमत 1.44 लाख रुपये असून किंमत 18.24 लाख रुपयांपर्यंत जाते. मात्र हीच गाडी तुम्हाला 7.5 लाख रुपयात मिळाली तर…

Updated: Dec 20, 2022, 06:21 PM IST

Hyundai Creta: ह्युंदाई क्रेटा एक लोकप्रिय एसयूव्ही असून या सेगमेंटमध्ये सर्वाधिक मागणी असलेली गाडी आहे. या गाडीची किंमत 1.44 लाख रुपये असून किंमत 18.24 लाख रुपयांपर्यंत जाते. मात्र हीच गाडी तुम्हाला 7.5 लाख रुपयात मिळाली तर…तुम्हाला सेकंड हँड ह्युंदाई क्रेटा 7.5 रुपयात मिळेल. ही गाडी विकत घेतल्यास तुम्हाला रोड टॅक्श भरण्याची आवश्यकता नाही. कारण पहिल्यांदा गाडी खरेदी करणाऱ्या व्यक्तीने रोड टॅक्स भरलेला आहे. ही गाडी कार्स24 या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊयात ह्युंदाई क्रेटा या एसयूव्हीबद्दल…

2015 ह्युंदाई क्रेटा 1.6 SX (o) CRDI Manual लिस्टेड आहे. ही गाडी 56,027 किमी चालली आहे. हे डिझेल इंजिन असून फर्स्ट ओनर कार आहे. या गाडीचा नंबर DL-8C ने सुरु होतो. गाडीची किंमत 7,72,000 रुपये इतकी आहे. नोएडामध्ये ही गाडी उपलब्ध आहे. 

2015 Hyundai Creta 1.6 S MANUAL देखील सूचीबद्ध आहे. ही गाडी 49,909 किमी चालली आहे. ही गाडी पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. फर्स्ट ओनर कार देखील आहे. या गाडीचा क्रमांक DL-1C ने सुरू होतो. कारसाठी 7,81,000 रुपयांची मागणी केली जात आहे. ही गाडी फक्त नोएडा मध्ये विक्रीसाठी आहे.

2015 Hyundai Creta 1.6 S MANUAL देखील येथे सूचीबद्ध आहे. ही कार फक्त 27,923 किमी धावली आहे. यात पेट्रोल इंजिन देखील आहे. ही कार देखील फक्त पहिली मालक आहे. त्याचा क्रमांक UP-32 ने सुरू होतो. कारची मागणी 8,47,000 रुपये आहे. नोएडा येथे कार विक्रीसाठी आहे.

बातमी वाचा- Electric Bullet ची जोरदार चर्चा, बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर धावणार 150 किमी

2018 Hyundai Creta 1.4 S CRDI MANUAL देखील सूचीबद्ध आहे. या गाडीसाठी 8,48,000 इतके रुपये मोजावे लागतील. ही गाडी नोएडात आहे. या गाडीचा क्रमांक UP-16 ने सुरू होतो. त्याने एकूण 84661 किमी अंतर कापले आहे. यात डिझेल इंजिन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *