Home » राष्ट्रीय » CM भगवंत मान यांच्या विरोधात पोलिसात तक्रार, दारू पिऊन गुरुद्वाऱ्यात…

CM भगवंत मान यांच्या विरोधात पोलिसात तक्रार, दारू पिऊन गुरुद्वाऱ्यात…

cm-भगवंत-मान-यांच्या-विरोधात-पोलिसात-तक्रार,-दारू-पिऊन-गुरुद्वाऱ्यात…

चंडीगड, 16 एप्रिल : भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी शनिवारी पंजाबचे (Punjab CM) मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या विरोधात पोलिसात ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. सीएम मान यांच्यावर आरोप आहे की, नशेच्या अवस्थेत त्यांनी गुरुद्वारेत प्रवेश केला. त्यांनी पंजाबचे पोलीस महानिर्देशकांकडे त्यांच्या तक्रारीवरुन कारवाई करण्याची मागणी केली आहे. बग्गा यांनी ट्विटरवर तक्रारीचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, पंजाबचे सीएम भगवंत मानच्या विरोधात नशेच्या अवस्थेत गुरुद्वारा दमदमा साहेबमध्ये प्रवेश करण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मी डीजीपी पंजाब आणि राज्याच्या पोलिसांना माझ्या तक्रारीवर कारवाई करण्याची विनंती करतो. काय आहे संपूर्ण प्रकरण… पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि चंदीगडमधील शीख धर्मस्थळांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) शुक्रवारी पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते भगवंत सिंग मान हे नशेच्या अवस्थेत १४ एप्रिलला तख्त दमदमा साहिबमध्ये दाखल झाले होते. हे ही वाचा-गुजरातमध्येही बुलडोजर कारवाई; रामनवमी हिंसाचार प्रकरणातील आरोपींची मालमत्ता अशी केली उद्ध्वस्त संघटनेने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडे माफीची मागणी केली होती. एसजीपीसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष रघुजीत सिंह विर्कने सांगितलं की, दारूच्या नशेत मुख्यमंत्र्यांनी शीख समुदायाचे एक अत्यंत सन्मानित अध्यात्मिक स्थळाचा दौरा केला आणि शीख समुदायाला माफी मागण्यास सांगितलं. बग्गा यांच्या विरोधात देखील प्रकरण… भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह बग्गा नेहमीच वादात असतात. बग्गा यांच्या विरोधात मोहालीच्या सायबर पोलिसांनी स्टेशनमध्ये गुन्हागारी प्रकरण दाखल केलं आहे. तेजिंदर पाल सिंह बग्गा यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आणि समाजाला धर्म आणि जातीच्या आधारावर विभागण्याचा प्रयत्न केला होता.

Published by:Meenal Gangurde

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Cm, Punjab

Leave a Reply

Your email address will not be published.