Home » राष्ट्रीय » देशात थंडी गायब पाऊस सुरू; येत्या काही तासात याठिकाणी कोसळणार सरी, IMDकडून इशारा

देशात थंडी गायब पाऊस सुरू; येत्या काही तासात याठिकाणी कोसळणार सरी, IMDकडून इशारा

देशात-थंडी-गायब-पाऊस-सुरू;-येत्या-काही-तासात-याठिकाणी-कोसळणार-सरी,-imdकडून-इशारा

Latest Weather in Maharashtra: सध्या उत्तर भारतातील अनेक राज्यातून थंडी गायब झाली आहे. थंडी गायब होताच वातावरणात मोठे बदल जाणवू लागले आहेत. काल दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यामध्ये वेगवान वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  पुणे, 26 फेब्रुवारी: सध्या उत्तर भारतातील अनेक राज्यातून थंडी गायब झाली आहे. थंडी गायब होताच वातावरणात मोठे बदल जाणवू लागले आहेत. काल दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यामध्ये वेगवान वाऱ्यासह पावसानं हजेरी (Rainfall) लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट (Hailstorm) देखील झाली आहे. रात्री उशिरापर्यंत याठिकाणी वादळी वाऱ्यासह (Gusty wind) हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू होता. आज पुन्हा दिल्लीसह उत्तरेतील काही भागात हवामान खात्यानं (IMD) पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ऐनवेळी पाऊस कोसळत असल्याने नागरिकांची पुरती धांदल उडताना दिसत आहे. आज सकाळपासूनच दिल्लीसह गाझियाबाद, नोएडा आणि हरियाणाच्या अनेक भागांत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील काही तासांतच याठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याशिवाय 28 फेब्रुवारीपासून उत्तर-पश्चिम भारतात विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता आहे. 3 मार्चपर्यंत याठिकाणी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हेही वाचा-कोरोनातून बरं झालेल्यांना जाणवतीये टिनिटसची गंभीर समस्या; वेळीच व्हा सावध दुसरीकडे, महाराष्ट्रात मात्र गेल्या दोन आठवड्यापासून कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार जाणवले आहेत. गेल्या दोन दिवसांत पुण्यासह राज्यातील अनेक भागात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. आज पुण्यात यंदा पहिल्यांदाच किमान तापमानाचा पारा 22 अंशापार गेला आहे. वडगाव शेरी याठिकाणी आज 22.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. कालही येथे कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम होती. हेही वाचा-ओमिक्रॉनपेक्षा धोकादायक त्याचा ‘धाकटा भाऊ’ BA.2, काय आहे तज्ज्ञांचा इशारा? यासोबतच आज महाबळेश्वर येथे 16.6,  सातारा 17.4, उस्मानाबाद 16.8, कोल्हापूर 20.5, सोलापूर 21.6, कुलाबा 20.6, सांताक्रूझ 18.8, ठाणे 19, परभणी 20.5, औरंगाबाद 16.5, माथेरान 18.8, पुणे 14.5, बारामती 16.3, रत्नागिरी 20.2, रायगड 20.9, मालेगाव 17.6, जालना 15.7, जळगाव 13.3, नाशिक 14, सांगली 19.3, जेऊर 16, अहमदनगर 14.8 आणि डहाणू येथे 19 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

  Published by:Maharashtra Maza News

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: India, Maharashtra, Weather forecast

  1 thought on “देशात थंडी गायब पाऊस सुरू; येत्या काही तासात याठिकाणी कोसळणार सरी, IMDकडून इशारा

  Leave a Reply

  Your email address will not be published.