Home » राष्ट्रीय » बहिणीच्या नणंदेवर जडला इतका जीव; दोघींचा आयुष्य एकत्र घालवण्याचा मोठा निर्णय

बहिणीच्या नणंदेवर जडला इतका जीव; दोघींचा आयुष्य एकत्र घालवण्याचा मोठा निर्णय

बहिणीच्या-नणंदेवर-जडला-इतका-जीव;-दोघींचा-आयुष्य-एकत्र-घालवण्याचा-मोठा-निर्णय

Lesbian marriage Churu: माझी मुलगी तशी अजिबात नव्हती. कुठल्या ना कुठल्या दबावात किंवा काहीतरी जादूटोणा झाल्याने ती तिच्यासोबत गेली असावी. तीन भावंडांमध्ये ती सर्वात लहान आहे. भाऊ मजुरीचे काम करतो तर दुसरा अपंग आहे. मुलगी सातवीपर्यंत शिकली आहे.

पुढे वाचा …

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  चुरू, 15 जानेवारी : एक 22 वर्षीय तरुणी सुमारे एक वर्षापूर्वी आपल्या बहिणीच्या सासरच्या घरी आली. येथे तिची बहिणीच्या ननंदेशी (Sister in law) भेट झाली. या दोघींच्या भेटीगाठी चांगल्याच वाढू लागल्या आणि जवळीक इतकी वाढली की दोघेही एकमेकांच्या प्रेमात (Reciprocal love) पडल्या. ही घटना राजस्थानच्या चुरू येथील आहे. एकमेकींच्या प्रेमात पडल्यानं रतनगडमधील 18 वर्षीय तरुणी रात्री घराबाहेर पडली आणि हरियाणातील आदमपूर मंडी येथील 22 वर्षीय तरुणीसोबत फतेहाबादमध्ये जावून दोघींनी लग्न केलं. या लेस्बियन  लग्नाची आता चांगली चर्चा होत आहे. लिव्ह इन रिलेशनशिपची कागदपत्रेही बनवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुली एकमेकींवर प्रेम करतात आणि त्यांना एकत्र राहायचे आहे. दोघींना खूप समजावले पण पटले नाही. एएसआयने सांगितले की, मुलींकडे हरियाणात लिव्ह-इन रिलेशनशिपची कागदपत्रे मिळाली आहेत. त्यांच्याकडे लग्नाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे नाहीत. रतनगड येथील रहिवासी मुलीच्या वडिलांनी सांगितले की, मी माझ्या मुलीला मी खूप समजावले. पण तरीही ती ऐकत नाही, तिला आम्ही सांगितलेले पटत नाही. माझी मुलगी तशी अजिबात नव्हती. कुठल्या ना कुठल्या दबावात किंवा काहीतरी जादूटोणा झाल्याने ती तिच्यासोबत गेली असावी. तीन भावंडांमध्ये ती सर्वात लहान आहे. भाऊ मजुरीचे काम करतो तर दुसरा अपंग आहे. मुलगी सातवीपर्यंत शिकली आहे. मुलीनं हे चुकीचं केलं आहे, पण आता मी तिला कसं समजावू? ती काही समजून घ्यायला तयार नाही. एकच हट्ट त्या हरियाणाच्या मुलीसोबतच राहणार वडिलांनी सांगितले की, ती फक्त एकच हट्ट धरून बसलेय की, त्या मुलीसोबत हरियाणाला जाणार. मुलीचे वडील सध्या शेती करतात. दुसरीकडे, हरियाणातील रहिवासी असलेल्या मुलीला चार भावंडे आहेत ज्यात ती स्वतः सर्वात मोठी आहे. तिच्या एका बहिणीचे लग्न माझ्या पुतण्याशी झाले आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर मुलगी दोन महिने हरियाणातील एका तरुणीसोबत राहत होती. 10 जानेवारीला संध्याकाळी आम्ही पोलिसांसोबत कार भाड्याने घेऊन हरियाणातील आदमपूरला गेलो. रात्रभर तिथेच थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आदमपूर पोलीस ठाण्यात गेले. तेथील पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. हे वाचा – Kidney Care Tips: किडनी निकामी करण्यास कारणीभूत ठरतात या 5 गोष्टी; आहारातील प्रमाण असावं मर्यादितच मुली म्हणाल्या आम्हाला मुक्त जगायचंय पोलिसांना दिलेल्या निवेदनात, रतनगडमधील 18 वर्षीय तरुणीने सांगितले की, तिला तिचे आयुष्य मुक्तपणे जगायचे आहे. याशिवाय हरियाणातील 22 वर्षीय तरुणीने सांगितले की, आम्ही दोघी एकमेकींवर प्रेम करतोय आणि भविष्यात आम्हाला एकत्र आयुष्य घालवायचे आहे. दोघांच्याही कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी त्यांना बराच वेळ समजावून सांगितल्यानंतरही त्या दोघी त्यांच्या म्हणण्यावर ठाम राहिल्या. सध्या ही बाब जिल्ह्यात चांगलीच चर्चेत असून लोक आपापल्या परीने या प्रकरणावर आपली मते मांडत आहेत. हे वाचा – Cancer Prevention Tips: कॅन्सरपासून चार हात लांबच रहाल; लाइफस्टाइलमध्ये करा फक्त हे दोन बदल दोन वर्षांपूर्वी जैसलमेरमध्येही समलिंगी विवाह झाला होता. सुमारे दोन वर्षांपूर्वी राजस्थानमधील जैसलमेरमध्ये एक समलिंगी विवाह झाला होता. तो तेव्हा खूप चर्चेत आला होता. जैसलमेरमध्ये फ्रेंच तरुणी आणि दक्षिण भारतीय मुलीने लग्न केले. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा पाच दिवस चालला. या विवाह सोहळ्यात संगीत आणि मेंदीचे विधीही पार पडले. या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी या दोन मुलींच्या कुटुंबीयांसह देश-विदेशातील अनेक पाहुण्यांनीही हजेरी लावली होती.

  Published by:Maharashtra Maza News

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Lifestyle, Marriage

  Leave a Reply

  Your email address will not be published.