Home » Uncategorized » Video Game नं घेतला मुलाचा जीव, बॉक्सिंग रिंगच्या रस्सीनं घेतलं स्वतःला लटकवून

Video Game नं घेतला मुलाचा जीव, बॉक्सिंग रिंगच्या रस्सीनं घेतलं स्वतःला लटकवून

video-game-नं-घेतला-मुलाचा-जीव,-बॉक्सिंग-रिंगच्या-रस्सीनं-घेतलं-स्वतःला-लटकवून

मध्य प्रदेश, 15 जानेवारी: राजधानी भोपाळ (Bhopal) मध्ये पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुलाला मोबाईलमध्ये फ्री फायर गेम (Free Fire Game)खेळण्याची आवड होती, असे पालकांचे म्हणणे आहे. पालकांनी पोलिसांना सांगितले की, तो मोबाईलशिवाय टीव्हीवरही गेम खेळायचा. मुलाला या गेमचं इतके वेड लागलं होतं की, त्याने स्वत: गेम फायटरचा ड्रेसही ऑनलाइन ऑर्डर केला होता. पोलिसांना (MP Police)घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. शंकराचार्य नगर बाजारिया येथे राहणारे योगेश ओझा हे ऑप्टिकलचे दुकान चालवतात. सूर्यांश हा त्यांचा 11 वर्षांचा एकुलता एक मुलगा होता. सूर्यांश हा अवधपुरीच्या सेंट झेवियर्स स्कूलमध्ये पाचवीत शिकत होता. बुधवारी दुपारी तो दुसऱ्या मजल्यावरील खोलीत चुलत भाऊ आयुषसोबत बसून टीव्हीवर चित्रपट पाहत होता. त्याचदरम्यान आयुष काही कामानिमित्त खाली आला. थोड्या वेळाने काकांची मुले खेळण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरच्या गच्चीवर पोहोचली तेव्हा त्यांना बॉक्सिंग रिंगमध्ये सूर्यांश दोरीला लटकलेला दिसला. रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू मुलांनी सूर्यांशला लटकलेला पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनी त्याचवेळी सूर्यांशला खासगी रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून मुलाला मृत घोषित केले. पोलीस मोबाईलची करणार तपासणी सूर्यांशचे वडील योगेश यांनी पोलिसांना सांगितलं की, मुलगा मोबाईलवर फ्री फायर गेम खेळत असे. याशिवाय तो जेव्हाही टीव्ही पाहायचा तेव्हा तो फक्त गेमसह मालिका पाहायचा. तो जास्तीत जास्त वेळ खेळात घालवत असे. वडिलांनी सांगितले की, आम्ही सगळे त्याला खेळ खेळायला नकार द्यायचो. मात्र त्याने कोणाचेच ऐकले नाही. पोलीस सूर्यांशच्या मोबाईलचीही तपासणी करणार आहेत. जेणेकरून त्याला खेळात टार्गेट देण्यात आले होते की नाही हे कळू शकेल. योगेशला तीन भाऊ आहेत. सर्व एकत्र कुटुंबात राहतात. तीन महिन्यांपूर्वीही आत्महत्येचा केला होता प्रयत्न पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यांशने तीन महिन्यांपूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तो लटकण्याच्या तयारीत होता, त्याआधीच आई पोहोचली. आईनं त्याला वाचवलं. यावर आईनेही त्याला खडसावले. सूर्यांश बहुतेकदा त्याच्या आजोबांचा मोबाईल गेम खेळायला घेऊन जायचा.

Published by:Maharashtra Maza News

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Madhya pradesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *