Home » Uncategorized » VIDEO: पत्नीच्या शेवटच्या इच्छेसाठी रिटायर्ड डॉक्टरने दान केली 5 कोटींची संपत्ती

VIDEO: पत्नीच्या शेवटच्या इच्छेसाठी रिटायर्ड डॉक्टरने दान केली 5 कोटींची संपत्ती

video:-पत्नीच्या-शेवटच्या-इच्छेसाठी-रिटायर्ड-डॉक्टरने-दान-केली-5-कोटींची-संपत्ती

जसबीर कुमार/शिमला, 14 जानेवारी : 5 कोटींची संपत्ती… आकडा वाचूनच तुम्हाला चक्कर आली ना. समाजसेवा म्हणून दान करायचं ठरवलं तरी इतकी संपत्ती दान करणारे क्वचितच. त्यातही जर उतारवय असेल, मुलंही नसतील त्यावेळी तर पैशांची सर्वात जास्त गरज असते. असं असताना एकही मूल नसलेल्या आणि आयुष्याच्या जोडीदाराने अर्ध्यावर साथ सोडलेल्या हिमाचल प्रदेशमधील रिटायर डॉक्टरने (Himachal pradesh retired doctor donation) आपली इतकी संपत्ती दान केली आहे. आयुष्यभर कमावलेली इतकी संपत्ती दान कऱण्यामागे कारण आहे ती या डॉक्टरची पत्नी. (Retired doctor donated 5 crores property for fullfill wife last wish). हमीरपूर जिल्ह्यातील नादौनच्या जोलसप्पड गावात राहणारे 72 वर्षांचे डॉ. राजेंद्र कंवर. त्यांची पत्नी जी शिक्षिका होती, तिचं वर्षभरापूर्वीच निधन झालं. दोघंही रिटायर झालेले. त्यांना एकही मूल नाही. अपत्य नसल्याने दोघांनीही आपली संपत्ती सरकारच्या नावे करण्याचं ठरवलं होतं. कंवर दाम्पत्याने एकत्र पाहिलेलं हे स्वप्न पत्नीच्या मृत्यूनंतर राजेंद्र यांनी प्रत्यक्षात आणलं. पत्नीची शेवटची इच्छा म्हणून त्यांनी आपली 5 कोटींची प्रॉपर्टी दान केली आहे. हे वाचा – फाळणीत दुरावलेले भाऊ तब्बल 74 वर्षांनंतर भेटले; करतारपूर कॉरिडॉरला ‘भरतभेट’ घराशिवाय नॅशनल हायवेजवळील जमीन आणि त्यांची गाडीही त्यांनी सरकारला दिली आहे. 23 जुलैला त्यांनी 2021 ला सरकारच्या नावाने इच्छापत्र दिलं आहे. आपली संपत्ती सरकारला दान करताना त्यांनी एक अटही ठेवली आहे. त्यांचं कोट्यवधींच्या घराला वृद्धाश्रम बनवावं अशी त्यांची इच्छा आहे. हे वाचा – शरीरविक्रय करणारी महिला संमती मागे घेऊ शकते, तर पत्नी का नाही? हायकोर्टाचा सवाल पत्रकारांशी बोलताना डॉ. कंवर यांनी सांगितलं, “जवळपास 5 कोटीची संपत्ती सरकारच्या नावे केली आहे. पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी इतर नातेवाईकांसोबत बसून हा निर्णय घेतला. त्यांनीही याला सहमती दर्शवली. ज्या लोकांना घरात जागा दिली जात नाही त्यांना म्हातारपणात इथं तिथं भटकावं लागतं. अशा लोकांची माझ्या कोट्यवधींच्या घरात राहण्याची सोय सरकारने करावी. तशी अटच वारसा हक्क पत्रात ठेवण्यात आली आहे”

Published by:Priya Lad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Couple, Doctor contribution, Himachal pradesh, Love story, Wife and husband

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *