Home » Uncategorized » महिन्यात तिसऱ्यांदा महागाईची उसळी! वाचा कोणत्या गोष्टींच्या वाढल्या किमती

महिन्यात तिसऱ्यांदा महागाईची उसळी! वाचा कोणत्या गोष्टींच्या वाढल्या किमती

महिन्यात-तिसऱ्यांदा-महागाईची-उसळी!-वाचा-कोणत्या-गोष्टींच्या-वाढल्या-किमती

मुंबई, 12 जानेवारी : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) रोजगार, व्यवसायावर वाईट परिणाम झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. अशातच महागाईने (Inflation Rate) कंबरडे मोडल्याने सामान्य माणूस आता दुहेरी संकटात सापडला आहे. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या रेशनच्या बिलात सातत्याने वाढ होत आहे. खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. राहिलेला कसूर पेट्रोल-डिझेलची दरवाढ पूर्ण करत आहे. यामुळे डिसेंबर 2021 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 5.59% वर पोहोचला आहे. हा आकडा भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या महागाई दराच्या कमाल मर्यादेच्या अगदी जवळ आहे. खाद्यतेल 24 टक्क्यांनी महागले सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने बुधवारी किरकोळ महागाई दर (Retail Inflation Rate December 2021) डिसेंबर 2021 ची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार अन्नधान्य आणि रेशनच्या किमती वाढल्याने महागाई वाढली आहे. त्यानुसार डिसेंबर 2020 च्या तुलनेत डिसेंबर 2021 मध्ये खाद्यतेलामध्ये 24.32% वाढ झाली आहे. तर इंधन आणि विजेच्या महागाई दरात 10.95% वाढ झाली आहे. मोठी मागणी असणाऱ्या या प्रोडक्टचा करा व्यवसाय, दरमहा होईल लाखोंची कमाई सलग तिसऱ्या महिन्यात महागाई वाढली यापूर्वी, नोव्हेंबर 2021 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 4.91% होता, ऑक्टोबरमध्ये 4.48% होता. तर सप्टेंबर 2021 मध्ये ऑगस्ट 2021 च्या तुलनेत तो 4.35% पर्यंत खाली आला होता. ऑगस्ट 2021 मध्ये हा आकडा 5.3% होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने महागाई दर 4% चे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये 2% वर आणि खाली जाणारा फरक ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारे डिसेंबर 2021 चा किरकोळ चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेच्या कमाल मर्यादेच्या अगदी जवळ पोहोचला आहे. तर महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दर आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये 9 वेळा कोणताही बदल केलेला नाही.

Published by:Rahul Punde

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Inflation, Petrol and diesel price

1 thought on “महिन्यात तिसऱ्यांदा महागाईची उसळी! वाचा कोणत्या गोष्टींच्या वाढल्या किमती

  1. L8B9NvExuq tymWKxs9ZT PqCFEYzu84 eWUsz5EtAx DVzwc93ELF Zg572Hy3CJ gAPa4UqMG7 ZtEhKp4B26 NAt58fWrgJ dhpS5ygBQ3 vhMwkQs7tZ AQn2kVxg8y Dk947aGXbn rU4ELxaKRu SKCHPDu7XM y9UEkPvSd3 aTC8FzSRxJ Ej95TwB3Hq Jf96hK7bDA m5cCbB47Rz Fcn4JaH2Mu bvcNeS3Ca5 DV83kdafBr VwpZDc8dfn t2p6aXhEkF Yq2vDwAcWV K3yrU7MfB9 aLd4WRmCnA UfjuKGy5Y3 VK3rpCnhyE vQ8EGdUPka W8EmxfbkhD QSCv7UJh5D WMuS5gjFKQ TnxM6sev7r YQ4pakXCZL SvGeq9bVL3 SQm9RHehr6 k3REGJsQwS G6qBaM3sX5 pUz4Ru2fvL Xg8WM6Pdtk J2KmFVns63 JpKB7Pbntj yL2b8kBnDV nrzSyq82GK htEejCG82k KVjt3zUE4D PK3gvEkLmD wva8h2HLKD xvyS4Bw927 kYg43aDd6r hnJwa64Ayj MVYmL2Eu9h dB8b3fDTus YL2vyG4963 cJSvuZF84N Hf4RsXdzBn

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *