Home » राष्ट्रीय » पैसे वाटल्याप्रकरणी खासदाराला तुरुंगवास, इतिहासात पहिल्यांदाच अशी शिक्षा

पैसे वाटल्याप्रकरणी खासदाराला तुरुंगवास, इतिहासात पहिल्यांदाच अशी शिक्षा

पैसे-वाटल्याप्रकरणी-खासदाराला-तुरुंगवास,-इतिहासात-पहिल्यांदाच-अशी-शिक्षा

हैद्राबादमधील तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या खासदार मलोत कविता (TRS MP Manot Kavita) यांना मतदारांना पैशांचं वाटप केल्याप्रकरणी न्यायालयानं सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची (6 months imprisonment) शिक्षा सुनावली आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 25, 2021 02:46 PM IST

हैदराबाद, 25 जुलै : निवडणुका म्हटलं की पैशांचा महापूर येणार, हे प्रत्येकानं गृहितच धरलेलं असतं. निवडणुकीच्या काळात अऩेक लोकप्रतिनिधी आणि उमेदवार मतदारांना पैसे वाटून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र या प्रकरणात आतापर्यंत कुणालाही न्यायालयानं (Court) शिक्षा (Punishment) सुनावल्याची घटना घडली नव्हती. हैद्राबादमधील तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या खासदार मलोत कविता (TRS MP Manot Kavita) यांना मतदारांना पैशांचं वाटप केल्याप्रकरणी न्यायालयानं सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची (6 months imprisonment) शिक्षा सुनावली आहे.

काय आहे प्रकरण

ही घटना आहे 2019 च्या लोकसभा निवडणुकांदरम्यानची. प्रचारादरम्यान काही कार्यकर्ते प्रत्येक मतासाठी 500 रुपये वाटत असल्याचं पोलिसांना दिसून आलं. यावेळी मलोत कविता यांचा सहकारी शौकत अलीला पोलिसांनी पैसे वाटताना रंगेहाथ अटक केली. त्याची चौकशी सुरु असताना त्याने मनोत कविता  यांच्यासाठी आपण काम करत असल्याचं पोलिसांना सांगितलं. बर्गमपहाड मतदारसंघात प्रत्येक मतासाठी 500 रुपये याप्रमाणं पैशांचं वाटप सुरू असल्याचं पोलिसांनी उघड केलं होतं.

न्यायालयात पुरावे

न्यायालयात हे प्रकरण पोहोचल्यानंतर पोलिसांनी पुराव्यांसह पैसेवाटपाची बाब सिद्ध केली. यावेळी शौकतनं खासदार मनोत यांचं नाव घेत, आपण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या आदेशावरूनच काम करत असल्याचं त्यांने म्हटलं. त्यामुळे न्यायालयानं मनोत कविता यांना सहआरोपी करून घेत शिक्षा सुनावली आहे.

हे वाचा -‘राज निर्दोष आहे, ते पॉर्न नाही तर..’ पतीच्या बचावासाठी शिल्पाचा चौकशीत असा दावा

यापूर्वीही झाली होती खासदारांना शिक्षा

निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी शिक्षा होण्याची ही पहिली वेळ असली, तर वेवगेगळ्या गुन्ह्यांसाठी खासदारांना शिक्षा होण्याच्या घटा यापूर्वीही तेलणंगणात घडल्या आहेत. भाजप खासदार राजा सिंह यांना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी तर तेलंगणा राष्ट्र समितीचे खासदार दानम नागेंद्र यांना एका सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती.

Published by: desk news

First published: July 25, 2021, 2:46 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed