Home » राष्ट्रीय » 3000 हजार रुपयांत बनवत होते प्रेशर कुकर बॉम्ब, ATS पुढे अतिरेक्यांनी उघडलं तोंड

3000 हजार रुपयांत बनवत होते प्रेशर कुकर बॉम्ब, ATS पुढे अतिरेक्यांनी उघडलं तोंड

3000-हजार-रुपयांत-बनवत-होते-प्रेशर-कुकर-बॉम्ब,-ats-पुढे-अतिरेक्यांनी-उघडलं-तोंड

उत्तर प्रदेशच्या लखनऊमधून पकडण्यात आलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांनी अखेर तोंड उघडलंय आणि त्यांच्या जबानीतून धक्कादायक माहिती समोर आल्याचं उत्तर प्रदेशच्या दहशवाद विरोधी पथकानं सांगितलं आहे

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 12, 2021 03:49 PM IST

लखनऊ, 12 जुलै: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखनऊमधून (Lucknow) पकडण्यात आलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांनी (Suspect terrorists) अखेर तोंड उघडलंय आणि त्यांच्या जबानीतून धक्कादायक माहिती समोर आल्याचं उत्तर प्रदेशच्या दहशवाद विरोधी पथकानं (UP ATS) सांगितलं आहे. या दोघांकडून काशी आणि मथुरेसह (Kashi and Mathura) काही शहरांचे नकाशे मिळाले असून त्यांनी 3000 रुपयांमध्ये एक कुकर बॉम्ब (Cooker Bomb) तयार करण्याचं काम केलं होतं, अशी माहितीदेखील उघड झाली आहे.

3000 रुपयांत बनवला कुकर बॉम्ब

इंटरनेटवर काही वेबसाईट बघून आपण बॉम्ब बनवायला शिकलो, असं अल्-कायदासाठी काम करणाऱ्या या दोन दहशतवाद्यांनी सांगितलं आहे. एकूण 3000 रुपयांत आपण कुकर-बॉम्ब तयार केल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशच्या एटीएसनं एक मॉड्युलदेखील जप्त केलं असून त्याचं नाव Do It Yourself असं आहे. विविध प्रकारची स्फोटकं वापरून स्वतः बॉम्ब कसा तयार करावा, हे शिकवणारं मॉड्युल वापरूनच दहशतवादी कारवाया सुरू असल्याचं आतापर्यंतच्या तपासातून समोर येत आहे. ई रिक्षाच्या बॅटरीचा वापर करून हा बॉम्ब तयार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

हे वाचा -पर्यटनस्थळी मान्सूनचं रौद्ररुप; ढगफुटी झाल्यानं वाहनं गेली वाहून, थरारक VIDEO

ही शहरं होती निशाण्यावर

या दोघांकडून काशी आणि मथुरा या शहरांचे नकाशे हस्तगत करण्यात आले असून या नकाशावर शहरातील काही भागांभोवती खुणा करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. एटीएसनं गोरखपूरचा एक नकाशाही या दहशतवाद्यांकडून जप्त केला आहे. मोठ्या शहरांमधील धार्मिक स्थळांवर हल्ले करण्याची योजना दहतवादी संघटनांची असल्याचं आतापर्यंतच्या पुराव्यांमधून प्रथमदर्शनी समोर येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोन दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इतर 10 ते 12 जणांना अटक केली असून त्यांच्या चौकशीतून या प्रकरणाचे अधिक धागेदोऱे शोधून काढण्याचं काम पोलीस करत आहेत.

Published by: desk news

First published: July 12, 2021, 3:17 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed