Home » राष्ट्रीय » शरद पवारांनंतर आता प्रशांत किशोर राहुल गांधींच्या भेटीला

शरद पवारांनंतर आता प्रशांत किशोर राहुल गांधींच्या भेटीला

शरद-पवारांनंतर-आता-प्रशांत-किशोर-राहुल-गांधींच्या-भेटीला

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची मंगळवारी दिल्लीत झालेली भेट ही सध्या देशभरात चर्चेचा विषय बनली आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 13, 2021 06:00 PM IST

नवी दिल्ली, 13 जुलै : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांची मंगळवारी दिल्लीत झालेली भेट (Meeting) ही सध्या देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. या बैठकीला काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधीदेखील (Priyanka Gandhi) उपस्थित होत्या. विशेषतः काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot singh Siddhu) यांनी केलेल्या ट्विटनंतर होणारी ही भेट असल्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. त्याचप्रमाणं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत बैठकी झाल्यानंतर प्रशांत किशोर हे राहुल गांधींना भेटल्यामुळे 2024 साठीची तयारी सुरू झाल्याचीही चर्चा रंगली आहे.

काय आहे प्रकरण

काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी नुकतचं एक ट्विट केलं होतं. पंजाबबाबत असणारा आपला दृष्टीकोन आणि आपलं काम यांची पारख ‘आम आदमी पक्षा’ला असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. या ट्विटनंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. नवज्योतसिंग सिद्धू पक्षाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असल्याची आणि पंजाब काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे सल्लागार प्रशांत किशोर हे राहुल गांधींची भेट घेण्यासाठी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.

सिद्धूंच्या नाराजीचं कारण

2017 साली पंजाब विधानसभा निवडणुकांपूर्वी नवज्योतसिंग सिद्धू भाजपमधून बाहेर पडले. त्यावेळी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसह अनेक पर्याय त्यांच्यापुढं होते. मात्र अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पंजाबच्या उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर सिद्धू यांना मिळाल्याचं सांगितलं जात होतं. अर्थात, कुणीही ऑन रेकॉर्ड तशी घोषणा केली नव्हती. प्रत्य़क्षात जेव्हा शपथविधीची वेळ आली, तेव्हा पंजाबच्या उपमुख्यमंत्र्यांची गरजच काय, असा सवाल करत अमरिंदर सिंगांनी ती शक्यता फेटाळून लावली. तेव्हापासून अमरिंदर आणि सिद्धू यांच्यात वितुष्ट असल्याची चर्चा आहे.

हे वाचा – काय हे! कोरोना पळाला की काय? मोदींच्या राज्यातच आहे ही अवस्था

राहुल-किशोर भेटीचं कारण

2017 साली पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांचे रणनितीकार म्हणून प्रशांत किशोर यांनी काम पाहिलं होतं. त्यानंतर त्यांना सल्लागारपदी नेमून कॅबिनेट दर्जा पंजाब सरकारनं दिला आहे. त्यामुळं पंजाबमधील प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे प्रतिनिधी म्हणून प्रशांत किशोर राहुल यांच्या भेटीला आल्याचं मानलं जात आहे.

Published by: desk news

First published: July 13, 2021, 5:57 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *