Home » Uncategorized » OMG! या मुलीच्या डोळ्यांतून आसवांसोबत टपकतात खडे, डॉक्टरही हैराण; पाहा VIDEO

OMG! या मुलीच्या डोळ्यांतून आसवांसोबत टपकतात खडे, डॉक्टरही हैराण; पाहा VIDEO

omg!-या-मुलीच्या-डोळ्यांतून-आसवांसोबत-टपकतात-खडे,-डॉक्टरही-हैराण;-पाहा-video

एका मुलीच्या उजव्या डोळ्यांतून पाण्यासोबत (Stones coming form eye of a girl) छोटे छोटे खडे बाहेर येत असल्याचं दिसून आलं आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  लखनऊ, 23 सप्टेंबर : एका मुलीच्या उजव्या डोळ्यांतून पाण्यासोबत (Stones coming form eye of a girl) छोटे छोटे खडे बाहेर येत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या मुलीला त्रास होत असून तिच्यावर उपचार (Treatment on eye problem) करण्याचे प्रयत्न आईवडील करत आहेत. मात्र अद्याप डॉक्टांनाही या समस्येचं कारण लक्षात आलेलं नाही. काय आहे प्रकार? उत्तर प्रदेशमधील कन्नौजजवळच्या वलीदादपूर गावात राहणाऱ्या चांदनी नावाच्या 15 वर्षांच्या तरुणीबाबत गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. तिच्या उजव्या डोळ्यातून अश्रुंसोबत छोटे छोटे खडे बाहेर पडतात. तिचा डोळा सतत लाल असतो आणि जेव्हा जेव्हा खडे बाहेर येतात, तेव्हा आपल्याला वेदना होत असल्याचं ती सांगते. आपल्या मुलीच्या या विचित्र आजाराची चिंता तिच्या आईवडिलांना सतावते आहे. डॉक्टरांचं उत्तर चांदनीला घेऊन एकदा तिचे वडील स्थानिक डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेले होते. डॉक्टरांनी चांदनीच्या डोळ्याची तपासणी केली असता त्यांना या आजाराचं कुठलंही निदान झालं नाही. डॉक्टरांनी वेगवेगळ्या चाचण्यादेखील करायला सांगितल्या. मात्र त्या सर्व चाचण्यांचे रिपोर्ट नॉर्मल असून नेमका कशामुळे हा त्रास तिला होत आहे, याचं कारण डॉक्टरांनाही समजत नाही. चांदनीच्या आईवडिलांनी दिलेल्या माहितीनुसार 27 जुलै रोजी पहिल्यांदा चांदनीच्या डोळ्यातून खड्यासारखा पदार्थ बाहेर आला. सुरुवातीला डोळ्यात काहीतरी गेलं असावं, असं वाटलं. मात्र त्यानंतर सातत्याने हा प्रकार सुरू असल्याचं ते सांगतात. सीतापूर, रुहेलखंड, बरेली अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटून आपण चांदनीचे डोळे दाखवले, मात्र कुठल्याही डॉक्टरांना त्याचं कारण समजत नसल्याचं ते सांगतात. हे वाचा – पाकिस्तान आणि चीनचा डाव फसला, UN मध्ये तालिबानला प्रतिनिधित्व नाहीच डॉक्टरांना अंदाज सर्व टेस्ट नॉर्मल असताना डोळ्यातून खडे वगैरे बाहेर पडणं, हे अतर्क्य असून चांदनी मुद्दाम सर्वांची फसवणूक करण्यासाठी डोळ्यातून खडे येत असल्याचं सांगत असावी, असा संशयदेखील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मात्र चांदनीच्या या अनोख्या आजाराची पंचक्रोशीत जोरदार चर्चा सुरू आहे.

  Published by:desk news

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *

  You may have missed