Saturday, July 24, 2021
Homeराष्ट्रीय5 वर्षांपासून न्याय मिळत नसल्याने तरुणाचा कोर्टात राडा;कंप्यूटर,फर्निचरची तोडफोड

5 वर्षांपासून न्याय मिळत नसल्याने तरुणाचा कोर्टात राडा;कंप्यूटर,फर्निचरची तोडफोड

राकेश नावाचा व्यक्ती 2016 पासून प्रलंबित असेलल्या आपल्या कोर्टातील केसबाबत न्याय मिळत नसल्याने नाराज होता.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 22, 2021 08:23 AM IST

नवी दिल्ली, 22 जुलै : एकदा कोर्टाची पायरी चढल्यानंतर त्यातून लवकर सुटका होणं, लवकर निकाल मिळणं तसं कठीणचं ठरतं. कोर्टाच्या सतत दिल्या जाणाऱ्या तारखांना संबंधित व्यक्तीला उपस्थित राहावं लागतं. पुन्हा तारीख दिली की पुन्हा तिच स्थिती. या मोठा वेळ जाण्यासह, पैसे खर्च होण्यासह न्याय मिळण्यासह मोठा उशीर होतो. अशाच एक प्रकार दिल्लीत उघड झाला आहे. न्याय मिळण्यास उशीर झाल्याने व्यक्तीने चक्क न्यायालयातच राडा करत वस्तूंची तोडफोड केली आहे.

दिल्लीतील Karkardooma कोर्टात न्याय मिळण्यास उशीर झाल्याने एका फिर्यादीने चांगलीच खळबळ उडवल्याची घटना समोर आली आहे. अतिशय धिम्या गतीने सुरू असलेल्या सुनावणीमुळे व्यक्ती नाराज होता. बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या सर्वात प्रसिद्ध डायलॉग्सपैकी एक तारीख पे तारीख ओरडत फिर्यादीने न्याय मिळण्यास उशीर झाल्याने कोर्टातील कंप्यूटर, फर्निचर तोडल्याची माहिती आहे. 17 जुलै रोजी ही घटना घडली.

शास्त्री नगर येथे राहणारा राकेश नावाचा व्यक्ती 2016 पासून प्रलंबित असेलल्या आपल्या कोर्टातील केसबाबत न्याय मिळत नसल्याने नाराज होता. ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राकेशने इतक्या वर्षांपासून न्याय मिळत नसल्याने, त्या रागात तारीख पे तारीख ओरडत कोर्टातील कंप्यूटर आणि फर्निचरची तोडफोड केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश आपल्या केससाठी सतत देण्यात येत असलेल्या तारखांमुळे नाराज होता. निकाल न लागता, न्याय मिळत नसल्याने पुन्हा तारीख मिळाल्याने त्याने कोर्ट रुममध्ये न्यायाधिशांच्या मंचावरच तोडफोड केली. कोर्ट रुम स्टाफने पोलिसांनी ही माहिती दिल्यानंतर त्यांनी राकेशला अटक केली आहे. राकेशला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं असता, त्याला तिथून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Published by: Karishma

First published: July 22, 2021, 8:22 AM IST

Tags:

Maharashtra Maza News Deskhttps://maharashtramazanews.com
सगळ्याचं क्षेत्रातील बातमी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी 'महाराष्ट्र माझा न्यूज ' टिम तत्पर आहे. काळानुसार राहा अपडेट फक्त एका क्लीकवर !
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments