Home » Uncategorized » धक्कादायक! WFH कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन कामासाठी घातक; Microsoftचा खुलासा

धक्कादायक! WFH कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन कामासाठी घातक; Microsoftचा खुलासा

धक्कादायक!-wfh-कर्मचाऱ्यांच्या-दीर्घकालीन-कामासाठी-घातक;-microsoftचा-खुलासा

Microsoft कंपनीनं केलेल्या एका अभ्यासात (Microsoft study about work from home) याबद्दल खुलासा करण्यात आला आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 23 सप्टेंबर: देशभरात आता कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी होऊ लागला  आहे. मात्र गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे अनेक कंपन्यांचं वर्क फ्रॉम सुरु आहे. काही कंपन्यांनी तर या वर्क फ्रॉम होमला (Work from Home) समोर वाढवत पुढील कित्येक काळासाठी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची संधी दिली आहे. तर TCS, Wipro सारख्या काही कंपन्यांनी या वर्षाच्या शेवटपर्यंत कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलावण्याचा  (TCS, Wipro work from end ends) निर्णय घेतला आहे. मात्र Microsoft कंपनीनं केलेल्या एका अभ्यासात (Microsoft study about work from home) याबद्दल खुलासा करण्यात आला आहे. TECHGIG नं याबद्दलचं वृत्त प्रकाशित केलं आहे. कर्मचारी त्यांच्या ऑफिसचं दैनंदिन कामकाज त्यांच्या राहत्या घरातूनच करू शकतात हे कोरोना महामारीनं दाखवून दिलं आहे. काही सर्व्हे (Microsoft survey about work from home) आणि अभ्यासातून हे सांगण्यात आलं की वर्क फ्रॉम होम सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे. मात्र Microsoft च्या अभ्यासातून याउलट खुलासा करण्यात आला आहे. वर्क फ्रॉम होम हे सर्व कर्मचाऱ्यांना जरी घरून काम करण्याची आणि आपल्या कुटुंबासोबत काम करण्याची संधी देत असेल तरी ते कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकतं असं या अभ्यासातून सांगण्यात आलं आहे. मायक्रोसॉफ्टच्या स्टडीप्रमाणे, वर्क फ्रॉम फोम हे कर्मचाऱ्यांना जरी आनंद देत असेल तरी त्यांच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी आणि कामासाठी हे घातक ठरू शकतं. म्हणजेच कर्मचाऱ्यांची लॉन्ग टर्म प्रोडक्टिव्हिटी कमी होऊ शकते. हे वाचा – IBM Recruitment: नामांकित Tech कंपनी IBM देशातील फ्रेशर्सना देणार नोकरी नक्की काय सांगतो हा अभ्यास अमेरिकेत सुमारे 61,000 मायक्रोसॉफ्ट कर्मचार्यांच्या डिसेंबर 2019 आणि जून 2020 दरम्यान गोळा झालेल्या संवादावरील डेटाचं  विश्लेषण करण्यात आलं. .त्यातील आकडेवारीवरून असं दिसून आलं की जेव्हा कर्मचारी घरातून कामावर शिफ्ट झाले तेव्हा त्यांच्या कामाचे तास वाढले आणि प्रताय्क्षात कम्युनिकेशन कमी झालं. म्हणजेच कर्मचाऱ्यांचा एकमेकांसोबत येणारा संपर्क कमी झाला. हे ठेवा लक्षात Microsoft नं हा अभ्यास डिसेंबर 2019 आणि जून 2020 दरम्यान करण्यात आला होता. त्यावेळी कोरोना नावाचा आजार जगभरातील लोकांना परिचित नव्हता तसंच कंपन्यांसाठी वर्क फ्रॉम होम ही पद्धत नवीन होती. त्यामुळे हा अभ्यास आता कितपत योग्य ठरेल हे बघावं लागेल. हे वाचा –  MAHAGENCO Recruitment: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत इंजिनिअर्ससाठी भरती ऑफिसमध्ये परत येण्यासाठी कर्मचाऱ्यांना ऑफर्स जगभरातील कंपन्या कर्मचाऱ्यांना भौतिक कार्यालयाच्या आवारात परत येण्यासाठी दबाव आणण्यासाठी ऑफर आणि प्रोत्साहन देऊन आमिष दाखवत आहेत. गोल्डमॅन सॅक्सने लंडन (London), न्यूयॉर्क (New York) आणि हाँगकाँगमधील कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना मोफत नाश्ता, दुपारचं जेवण आणि आइस्क्रीम देऊ केलं आहे, तर अॅमेझॉननं (Amazon) पुजेट साउंड आणि आर्लिंग्टन मुख्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी स्थानिक विक्रेत्यांकडून 100,000 कप कॉफी खरेदी केली आहे.

  Published by:Atharva Mahankal

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *