Home » Uncategorized » Air India चं खासगीकरण अखेरच्या टप्प्यात! Tata बरोबर याही कंपनीने लावली बोली

Air India चं खासगीकरण अखेरच्या टप्प्यात! Tata बरोबर याही कंपनीने लावली बोली

air-india-चं-खासगीकरण-अखेरच्या-टप्प्यात!-tata-बरोबर-याही-कंपनीने-लावली-बोली

केंद्र सरकारने एअर इंडिया (Air India) या प्रसिद्ध विमान कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्यापासून तो मोठा चर्चेत आहे. त्यासाठी काही मोठ्या कंपन्या बोली लावण्याच्या तयारीत असून आता टाटा संस (Tata Sons) कंपनीनेही पुढाकार घेतला आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  दिल्ली, 15 सप्टेंबर : केंद्र सरकारने एअर इंडियाच्या (Air India privatisation)  खासगीकरणाचा निर्णय घेतल्यापासून मोठी चर्चा सुरू झाली आहे. मूळात जमशेदजी टाटांनी स्थापन केलेली ही कंपनी पुन्हा विकत घ्यायला टाटा कंपनी सरसावली आहे. पण बोलीच्या स्पर्धेत इतरही काही मोठ्या कंपन्या उतरल्याने चुसर वाढली आहे. टाटा सन्स (Tata Sons) कंपनीने पुढाकार घेतला आहे. टाटांकडून एअर इंडियासाठी Bid दाखल केल्याची अधिकृत माहिती पुढे आली आहे. इतर काही कंपन्याही या बोली लावण्याच्या रेसमध्ये उतरण्याची शक्यता आहे. एअर इंडियाचा शत-प्रतिशत वाटा विकला जाणार डिपार्टमेंट ऑफ इन्वेस्टमेंट अॅंड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंटचे (DIPAM) सचिव तुहीन कांता पांडे यांनी टाटा कंपनीकडून प्रस्ताव किंवा बोली दाखल झाल्याचं सांगितलं आहे.

  Financial bids for Air India disinvestment received by Transaction Adviser. Process now moves to concluding stage. pic.twitter.com/0NxCJxX5Q1

  — Secretary, DIPAM (@SecyDIPAM) September 15, 2021

  टाटा कंपनीबरोबर स्पाइस जेटनेसुद्धा Air India साठी बिड दाखल केल्याची माहिती आहे. NDTV ने याबाबत वृत्त दिलं आहे. एअर इंडियाच्या मालकीच्या दिल्ली आणि मुंबईतल्या मोठ्या इमारती आणि प्रॉपर्टीसह संपूर्ण कंपनीचं खासगीकरण होणार आहे. सरकार आपला 100 टक्के वाटा विकणार आहे. आता ही कंपनी तिच्या मूळ संस्थापकांच्याच ताब्यात जायची शक्यता जास्त आहे टाटांनी आपली स्वतःची विमानसेवा 1932 मध्ये सुरू केली. ब्रिटीश काळात सुरू झालेली ही पहिली भारतीय विमान सेवा. पण पुढे 1942 मध्ये टाटा एअरलाइन्स राष्ट्रीयीकृत झाली. भारत सरकारने ती ताब्यात घेऊन त्याचं एअर इंडिया असं नामकरण केलं. 1977 पर्यंत JRD टाटा हेच एअर इंडियाचे चेअरमन होते. एअर इंडियामध्ये  गुंतवणुकीसाठी (Air India Disinvestment) सरकारकडे काही चांगले प्रस्ताव आले आहेत. त्यामुळे आता नियमांनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. केंद्र सरकार एअर इंडियामधील आपला सर्व 100 टक्के वाटा विकण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कंपनी पूर्णत: खाजगी होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या सरकारची AI Express Ltd मध्ये 100 टक्के भागीदारी तर एअर इंडिया SATS Airport Services Private लिमिटेडमध्ये 50 टक्के एवढा वाटा आहे. दूरसंचार क्षेत्रात 100 % FDI ला परवानगी; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय 2020 मध्ये सुरू झाली होती खाजगीकरणाची प्रक्रिया तोट्यात गेलेली एअर इंडिया विकण्याचा निर्णय सरकारने जानेवारी 2020 मध्येच घेतला होता. त्याचवेळी त्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु कोरोनामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 15 सप्टेंबर ही लिलावाची शेवटची तारीख ठरवण्यात आली. मध्यंतरी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी लिलावाचा दिवस पुढे ढकलण्यात येणार नाही, असं स्पष्ट केलं होते. 2018 च्या सुरुवातीला सरकारने एअर इंडियातली 33 टक्के भागिदारी विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो टप्याटप्याने वाढवत नेला गेला. एअर इंडियावरील कर्ज हे सध्याच्या घडीला 43 हजार कोटी रुपयांवर पोहचले असल्याची माहिती काही सूत्रांनी दिली आहे. त्याच्या खाजगीकरणानंतर सरकार त्या कर्जाची परतफेड करणार आहे.

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *