Home » राष्ट्रीय » पोर्नोग्राफी आणि हिंदू पुराणकथांबाबत राज कुंद्राने केलेली जुनी Tweets झाली VIRAL

पोर्नोग्राफी आणि हिंदू पुराणकथांबाबत राज कुंद्राने केलेली जुनी Tweets झाली VIRAL

पोर्नोग्राफी-आणि-हिंदू-पुराणकथांबाबत-राज-कुंद्राने-केलेली-जुनी-tweets-झाली-viral

सॉफ्ट पॉर्नोग्राफी (Soft Pornography) प्रकरणात अटक झालेला उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याचे जुने ट्विट्स (Old Tweets) त्याला अडचणीत आणणारे ठरू शकतात, अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 21, 2021 04:35 PM IST

मुंबई, 21 जुलै : सॉफ्ट पॉर्नोग्राफी (Soft Pornography) प्रकरणात अटक झालेला उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याचे जुने ट्विट्स (Old Tweets) त्याला अडचणीत आणणारे ठरू शकतात, अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

सॉफ्ट पॉर्न व्हिडिओ तयार करण्यात राज कुंद्राचा मोठा सहभाग असल्याच्या संश्यावरून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सॉफ्ट पॉर्नचं समर्थन करणारे राज कुंद्राचे ट्विट त्यानं जवळपास नऊ ते दहा वर्षांपूर्वी केलेले आहेत. मात्र त्यातून पॉर्न व्हिडिओकडं पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन स्पष्ट होत असल्याचं दिसून येतं, असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे.

India: Actors are playing cricket, Cricketers are playing politics, Politicians are watching porn and Porn stars are becoming actors….!

— Raj Kundra (@TheRajKundra) May 3, 2012

राज कुंद्राचे विचार

राज कुंद्राच्या जुन्या ट्विट्समधून सॉफ्ट पॉर्न आणि पॉर्नची भलामण केल्याचं दिसून येतं. कधी न्यूटनचा उल्लेख करून, कधी राजकारणी आणि पॉर्न स्टारचा संदर्भ देत राज कुंद्रा सॉफ्ट पॉर्नचं समर्थन करताना दिसतो. जर वेश्याबाजारात पैसे देऊन व्यवहार चालतो, तर याच गोष्टी स्क्रीनवर करायला काय हरकत आहे, असा सवालही राज कुंद्रानं उपस्थित केला आहे. अर्थात, हे ट्विट्स जुने आहेत आणि ट्विटरवर व्यक्त केलेल्या मतांचा न्यायालयीन लढाईत कितपत संदर्भ घेतला जाईल, यावरही अऩेक गोष्टी अवलंबून असू शकतात. मात्र या जुन्या ट्विटच्या निमित्तानं राज कुंद्राचे विचार जगासमोर आले आहेत.

हे वाचा – ‘ती’ कोणाची? लग्नाच्या 1दिवस आधी रक्तपात, होणाऱ्या पत्नीच्या BFवर झाडल्या गोळ्या

आपण कंपनी विकली होती, असा दावा राज कुंद्रानं केला आहे. मात्र तरीही पडद्याआडून त्याचा या सॉफ्ट पॉर्न इंडस्ट्रीत मोठा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Published by: desk news

First published: July 21, 2021, 4:35 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed