Home » राष्ट्रीय » गडकरीजी, तुम्ही सर्वात यशस्वी मंत्री आहात, पण… ! माजी मंत्र्याचं पत्र

गडकरीजी, तुम्ही सर्वात यशस्वी मंत्री आहात, पण… ! माजी मंत्र्याचं पत्र

गडकरीजी,-तुम्ही-सर्वात-यशस्वी-मंत्री-आहात,-पण…-!-माजी-मंत्र्याचं-पत्र

नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे मोदी सरकारमधील (Modi Government) सर्वात यशस्वी (Successful) आणि कार्यक्षम (able) मंत्री आहेत, मात्र त्यांच्या अपरोक्ष काही अधिकारी (Officers) त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं पत्र देशाचे माजी मंत्री सज्जन सिंग वर्मा (Sajjan Singh Varma) यांनी लिहिलं आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 16, 2021 05:23 PM IST

नवी दिल्ली, 16 जुलै: नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे मोदी सरकारमधील (Modi Government) सर्वात यशस्वी (Successful) आणि कार्यक्षम (able) मंत्री आहेत, मात्र त्यांच्या अपरोक्ष काही अधिकारी (Officers) त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं पत्र देशाचे माजी मंत्री सज्जन सिंग वर्मा (Sajjan Singh Varma) यांनी लिहिलं आहे. काँग्रेसचे नेते असलेल्या सज्जन सिंग यांनी गडकरींकडे अधिकाऱ्यांची तक्रार करण्यापूर्वी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे.

काय आहे प्रकरण?

मध्यप्रदेशातील देवासमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांत 7 च्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयानं कोट्यवधींच्या निविंदांना मंजुरी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात काम करणारे कंत्राटदार आणि अधिकारी हे संगनमतानं कोट्यवधींचा अपहार करत असल्याची टीका सज्जन सिंग वर्मा यांनी पत्र पाठवून केली आहे. यापूर्वीदेखील नितीन गडकरींनी मध्यप्रदेशातील अनेक रस्त्यांचं चौपदरीकरण करण्याचं मोठं काम केलं, आताही ते सुरूच आहे. मात्र काही अधिकारी यात भ्रष्टाचार करत असून त्याला आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती या पत्रातून गडकरींना करण्यात आली आहे.

श्री नितिन गडकरी जी, आपके मंत्रालय के कुछ अधिकारियों द्वारा मध्यप्रदेश के देवास जिले में राजमार्ग के लिए भूमि अधिग्रहण करने में अवार्ड राशि में भ्रष्टाचार कर आपकी प्रतिष्ठा के विपरीत कार्य किया जा रहा है। पीड़ित जनता आपसे न्याय चाहती है, कृपया संज्ञान ले।@nitin_gadkari pic.twitter.com/eMkBPaU78e

— Sajjan Singh Verma (@sajjanvermaINC) July 15, 2021

देवास जिल्ह्यातील ग्रामीण भागातून रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत, असं पत्रात म्हटलं आहे. वेगवेगळ्या गावातील शेतकऱ्यांना त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्यासाठी त्यांनी त्यांची पत्रं माझ्याकडे दिली असून या ग्रामस्थांचाच आवाज मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, असं वर्मा यांनी म्हटलं आहे.

हे वाचा -मोठी बातमी: तब्बल 4 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव, हे आहे कारण

वर्मा यांच्या पत्राला गडकरींकडून अद्याप कुठलंही जाहीर उत्तर देण्यात आलेलं नाही. मात्र रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याची बाब मात्र समोर आली आहे. आता या प्रकरणी काही चौकशी होते का आणि पुढे काय कारवाई होते, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Published by: desk news

First published: July 16, 2021, 4:06 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published.