Home » राष्ट्रीय » उंदरांनाही लागली दारूची चटक? दुकानातील 12 बाटल्या केल्या रिकाम्या अन्…

उंदरांनाही लागली दारूची चटक? दुकानातील 12 बाटल्या केल्या रिकाम्या अन्…

उंदरांनाही-लागली-दारूची-चटक?-दुकानातील-12-बाटल्या-केल्या-रिकाम्या-अन्…

Representative Image

घटनेत सरकारी दुकानातील दारूच्या 12 बाटल्या उंदरांनी रिकाम्या (Rats Drunk 12 Bottle Liquor) केल्या आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी हे प्रकरण उघडकीस आलं.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  बंगळुरू 06 जुलै: लॉकडाऊनदरम्यान (Lockdown) अशा अनेक तळीरामांच्या बातम्या किंवा व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील ज्यांची दारू (Liquor) न मिळाल्यानं वाईट अवस्था झाली आहे. अनेक लोक असे असतात ज्यांचा एका दिवसही दारूशिवाय जात नाही. त्यामुळे, एखाद्या माणसाला दारूचं व्यसन लागल्यावर कोणाला काहीही नवल वाटणार नाही किंवा तसं वाटण्यासारखं काही नाहीही. मात्र, आता समोर आलेली एक बातमी वाचून तुम्हीही थक्क व्हाल. कारण या घटनेत चक्क उंदरांनाच दारूचं व्यसन लागल्याचं समोर आलं आहे. OMG! मानवी वस्तीत घुसलेल्या हत्तीचा धुमाकूळ; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO ही घटना तमिळनाडूच्या (Tamil Nadu) निलगिरी जिल्ह्यातील गुडालूर शहरातील आहे. या घटनेत सरकारी दुकानातील दारूच्या 12 बाटल्या उंदरांनी रिकाम्या (Rats Drunk 12 Bottle Liquor) केल्या आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी हे प्रकरण उघडकीस आलं. तामिळनाडू राज्य विपणन महामंडळाच्या  कर्मचार्‍यांनी कदमपुझा परिसरातील लॉकडाऊनपासूनच बंद असलेलं दारूचं दुकानं उघडल्यानंतर ही बाब समोर आली. खरं की खोटं? Amazon वर मोठी सवलत; 1 लाखांचा AC अवघ्या 6 हजारात, 278 रुपयांचं EMI दुकान उघडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पाहिलं, की दारूच्या 12 बाटल्यांचं झाकण उघडलेलं आहे आणि या बाटल्या पूर्णपणे रिकाम्या झालेल्या आहेत. या बाटल्यांवर उंदरांच्या दातांच्या खुणा आढळून आल्या. या घटनेची माहिती मिळताच राज्य विपणन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. या तपासात असं समोर आलं की दुकानातील उंदरांनीच हे काम केलं आहे. या दारूच्या बाटल्यांची किंमत सुमारे 1500 असल्याचं सांगितलं जात आहे.

  Published by:Kiran Pharate

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *