सावधान! आता हलगर्जी नको; पुढचे 100 ते 125 दिवस महत्त्वाचे, तज्ज्ञांनी दिला Alert

देशात कोरोनाची प्रकरणं (Coronavirus in india) कमी होण्याचा वेग मंदावला आहे आणि ही धोक्याची घंटा आहे.
- Maharashtra Maza News
- Last Updated: Jul 16, 2021 05:47 PM IST
नवी दिल्ली, 16 जुलै : जगात कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) आल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली आहे. भारतातही लवकरच कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave in india) धडकणार असे संकेत देण्यात आले आहेत. आता पुढील 100 ते 125 दिवस कोरोना लढ्यातील (Fight against corona in India) महत्त्वाचे दिवस आहेत, असं सांगत केंद्र सरकारने सर्वांना अलर्ट केलं आहे.
देशात कोरोनाची प्रकरणं (Coronavirus in india) कमी होण्याचा वेग मंदावला आहे आणि ही धोक्याची घंटा आहे. पुढील 100 ते 125 दिवस भारतात कोरोना लढ्यात खूप महत्त्वाचे आहेत, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (VK Paul) यांनी सांगितलं आहे.
कोरोना नियम शिथील केले जात आहे. अशात नागरिक अनेक ठिकाणी सर्रासपणे कोरोना नियमांचं उल्लंघन करत आहेत. गर्दी करणं, मास्कचा वापर न करणे असं बेफिकीरपणे लोक वागू लागले आहेत. त्यामुळेच तिसऱ्या लाट येणं अटळ आहे, असं तज्ज्ञांनीही सांगितलं आहे.
पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
देशातील काही राज्यांत वाढत्या कोरोनाच्या (Corona) रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकारची चिंता कायम आहे. यामुळेच आज स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या प्रकरणी एक महत्त्वाची बैठक घेतली. ज्या राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे अशा सहा राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांनी बैठक घेतली. यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra), तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होता. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचा सल्ला दिला.
हे वाचा – Coronavirus: गर्दी थांबवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरच व्यापक धोरणाची गरज – CM
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात कोरोनाचे एकूण रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण आणि मृत्यू हे केवळ याच राज्यात झाले आहेत. त्यामुळे तातडीने योग्य ती पावलं उचलणं आवश्यक आहे. कोविड आपत्कालीन प्रतिसाद अंतर्गत 23 हजार कोटींचा निधी ठेवण्यात आला आहे. याचा उपयोग आरोग्य सेवांमध्ये केला पाहिजे. ग्रामीण भागांत अधिक लक्ष देणे आवश्यक आहे असा सल्लाही यावेळी पंतप्रधानांनी दिला आहे.
हे वाचा – Corona Alert : लस घेऊनही कोरोना झालेल्या 80 टक्के नागरिकांमध्ये डेल्टा व्हायरस
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, राज्यांनी आपला डेटा पारदर्शक पद्धतीने सार्वजनिक करायला हवा. यावेळी पंतप्रधानांनी सर्व सहा राज्यांना कटोर सूचना दिल्या की, कोणत्याही परिस्थितीत तिसरी लाट येणं टाळलं पाहिजे. तज्ञांनी हे स्पष्ट केले आहे की, जर परिस्तिती सुधारली नाही तर खूप गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. ज्या देशांची परिस्थिती कोरोनामुळे गंभीर होत आहे अशा देशांची उदाहरणेही यावेळी पंतप्रधानांनी दिली आहेत.
गर्दी थांबवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर व्यापक धोरणाची मुख्यमंत्री ठाकरेंची मागणी
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Corona pandemic) मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने धार्मिक, सामाजिक कारणे तसेच राजकीय कार्यक्रम, आंदोलने यामुळे विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच (Central Government) आता देशपातळीवर एक व्यापक धोरण आणावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना केली आहे.
Published by: Priya Lad
First published: July 16, 2021, 5:13 PM IST