Home » राष्ट्रीय » प्रेयसीचा भाऊ असल्याचं नाटक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडलं, वाचा पूर्ण प्रकरण

प्रेयसीचा भाऊ असल्याचं नाटक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडलं, वाचा पूर्ण प्रकरण

प्रेयसीचा-भाऊ-असल्याचं-नाटक-करणाऱ्या-तरुणाला-पोलिसांनी-पकडलं,-वाचा-पूर्ण-प्रकरण

मुंबई, 06 ऑगस्ट:  अनेकदा प्रेम असलेल्या मुलीचं दुसऱ्याशी लग्न होतं हा धक्का काहीजण सहन करू शकत नाहीत. काहीजण जड अंत:करणानं विसरून जातात खरं पण काहीजण मात्र ते विसरू शकत नाहीत. आणि त्यातूच मग त्या मुलीला लग्नानंतरही त्रास दिला जातो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात  घडली आहे. आजतकच्या वेबसाईटवर याबद्दलचं वृत्त देण्यात आलं आहे. पोलिसांनी या आरोपीला पकडून सध्या तरी कडक इशारा देऊन सोडलं आहे. ज्या बहिणीला मारहाण होते अशी तक्रार हा तरूण करत होता तिच्यावर त्याचं एकतर्फी प्रेम असल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशमधील महाराजगंज जिल्ह्यात एक प्रेमी युवक आपल्या प्रेयसीचा भाऊ असल्याची बतावणी करून तिच्या पतीची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. आपल्या बहिणीला सासरी खूप मारहाण होत असल्याची तक्रार या युवकानं पोलिसांकडे केली. पण पोलिसांना त्याच्या बोलण्यावरून काहीतरी संशय आला. त्याला पोलिसांनी पकडलं त्याची उलट तपासणी घेतली तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला. खरं तर या तरुणाचं या मुलीवर एकतर्फी प्रेम होतं; पण जेव्हा त्याचं त्या मुलीशी लग्न करण्याचं स्वप्न खरं झालं नाही तेव्हा तो प्रेयसीचा संसार उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागलाया पुढे या लग्न झालेल्या माहिलेच्या आयुष्यात जर त्यानं कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ केली तर त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा एसपी कौस्तुभ कुमार यांनी या कथित प्रेमी तरुणाला दिला आहे असं त्यांनी सांगितलं. हेही वाचा – Shocking! सर्पदशांने मृत्यू झालेल्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या तरुणालाही चावला साप, रुग्णालयात मृत्यू या महिलेचं लग्न दोनच महिन्यांपूर्वी झालं आहे. जेव्हा या तरुणाबद्दल या महिलेच्या पतीला पोलिसांनी सांगितलं तेव्हा त्याला रडू कोसळलं. याच व्यक्तीनं आपलं या तरुणीशी लग्न लावून दिलं होतं, असं तिच्या पतीचं म्हणणं आहे. आता तो आपल्या सुखी वैवाहिक आयुष्यात विष कालवतोय असा आरोप त्यानं केला. हा तरुण सतत आपल्या पत्नीला त्रास देत असल्याचंही त्यानं सांगितलं. संपूर्ण गावात आपली या तरुणानं बदनामी केली आहे. अनेकजण तुझ्या बायकोचे दोन-दोन पती आहेत असे टोमणे आपल्याला मारत आहेत. मी खूप वाईट अडकलो आहे, असं त्या महिलेच्या पतीनं सांगितलं. गुरुवारी (4 ऑगस्ट 22) हा कथित प्रेमी तरुण एक अर्ज घेऊन एसपींकडे गेला होता. आपल्या बहिणीला सासरी जाच होतो आहे अशी तक्रार त्यानं केली. आपल्या बहिणीला सासरच्यांनी अमानुष पद्धतीने मारहाण केल्याचं त्यानं सांगितलं. इतकंच नाही तर तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचंही त्यानं सांगितलं. सहाजिकच पोलिसांनी त्याची तक्रार गांभीर्यानं घेतली आणि त्याची चौकशी सुरु केली. मात्र त्यानंतर अनेक प्रश्नांना उत्तरं देताना या तरुणाची गडबड उडाली. कधी हॉस्पिटलमध्ये असलेली महिला ही आपली मावस बहीण असल्याचं त्यानं सांगितलं तर कधी ती चुलत बहीण असल्याचं तर कधी भाची असल्याचं त्यानं सांगितलं. त्यामुळे पोलिसांना त्याच्याबद्दल संशय निर्माण झाला, असंही पोलिसांनी सांगितलं. सध्या तरी फक्त इशारा देऊन या कथित प्रेमी तरुणाला सोडलेलं आहे. पण पोलिसांची त्याच्यावर नजर राहणार आहे असंही पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Crime news

1 thought on “प्रेयसीचा भाऊ असल्याचं नाटक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडलं, वाचा पूर्ण प्रकरण

Leave a Reply

Your email address will not be published.