Home » राष्ट्रीय » शेतकरी असे अडकले माशांच्या ‘जाळ्यात

शेतकरी असे अडकले माशांच्या ‘जाळ्यात

शेतकरी-असे-अडकले-माशांच्या-‘जाळ्यात

प्रतिकात्मक फोटो

मध्यप्रदेशातील अनेक शेतकऱ्यांची हरियाणातील एका कंपनीनं कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  भोपाळ, 8 जुलै : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) अनेक शेतकऱ्यांची हरियाणातील एका कंपनीनं कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Fraud) केली आहे. मत्स्यशेतीची (Fish Farming) आणि भरमसाठ पैशांची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचं समजलं, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. हरियाणाच्या (Haryana) एका कंपनीवर विश्वास ठेऊन अनेक शेतकऱ्यांनी आपली आयुष्यभराची कमाई या कंपनीला दिली. मात्र कंपनीनं ही रक्कम घेऊन पोबारा केला. अशी झाली फसवणूक हरियाणाच्या गुरुग्राममधील फिश फॉर्च्युन प्रॉड्युस या नावाच्या एका कंपनीनं मध्यप्रदेशमधील भोपाळजवळील गावांतील काही शेतकऱ्यांसोबत लेखी करार केला. या करारानुसार शेतकऱ्यांनी या कंपनीला मासेपालनासाठी 5 लाख रुपये द्यायचे आणि त्यांच्या शेतात विहीर खणून देण्यासाठी 50 हजार रुपये द्यायचे, असं ठरलं. आता ही सगळी रक्कम कंपनी एकरकमी घेणार आणि पुढच्या 15 महिन्यांमध्ये नफ्यासह ती परत करणार, असा हा करार होता. दुसऱ्या एका योजनेनुसार शेतकऱ्यांनी कंपनीला साडेपाच लाख रुपये द्यायचे आणि 20 महिन्यांत ही कंपनी रक्कम दुप्पट करून परत देणार, असं ठरलं. या बदल्यात कंपनीनं सुरक्षा म्हणून शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांचा एक चेकदेखील दिला. मात्र शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन ही कंपनी निघून गेली. जेव्हा शेतकऱ्यांनी हा चेक वठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो ब्लॉक करण्यात आल्याचं त्यांना बँकेकडून सांगण्यात आलं. हे वाचा – Delhi Riots : Facebook च्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पोलीस तपास सुरू या प्रकऱणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे. आतापर्यंत विविध भागातील 86 शेतकऱ्यांची अशा प्रकारे फसवणूक झाल्याचं समोर आलं असून या कंपनीनं शेतकऱ्यांकडून 5 कोटींपेक्षाही अधिक रक्कम लुबाडल्याचं सिद्ध झालं आहे. शेतकऱ्यांनी खातरजमा न करता पैशांच्या लोभाने अशा प्रकारच्या फसव्या योजनांमध्ये पैसे गुंतवू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. कंपनीची शहानिशा न करता पैसे गुंतवल्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे वाढल्याचंही पोलीस सांगतात.

  Published by:desk news

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *

  You may have missed