Home » राष्ट्रीय » रिक्षातून अचानक रस्त्यावर पडला चिमुकला; मागून वेगात आली बस अन्…, Video

रिक्षातून अचानक रस्त्यावर पडला चिमुकला; मागून वेगात आली बस अन्…, Video

रिक्षातून-अचानक-रस्त्यावर-पडला-चिमुकला;-मागून-वेगात-आली-बस-अन्…,-video

नवी दिल्ली 14 जून : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये देवदूत बनून आलेला एक वाहतूक पोलीस रस्त्याच्या मधोमध एका मुलाला कशाप्रकारे वाचवतो हे पाहायला मिळतं (Traffic Policeman Saves Child). हा सगळा प्रकार मुलगा अचानक रिक्षातून आईच्या मांडीवरुन खाली पडल्याने घडला. मुलाची आई इलेक्ट्रिक रिक्षामध्ये बसली असताना ही घटना घडली. धावत्या मेट्रो ट्रेनवर चालताना दिसले 8 लोक; Shocking Video पाहून येईल अंगावर काटा हा व्हिडिओ प्रशासकीय सेवा अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ उत्तराखंडमधील काशीपूरचा असल्याचं सांगण्यात येत आहे. सीपीयूचे कर्मचारी सुंदर लाल इथे असलेल्या चीमा चौकात वाहतूक व्यवस्था हाताळत होते. इतक्यात समोरून येणाऱ्या कारला ओव्हरटेक करत असताना ई-रिक्षाचालकाने रिक्षा जोरात वळवली.

ट्रैफ़िक पुलिस के जवान सुंदर लाल.🙏 pic.twitter.com/ulmX48a5ki

— Awanish Sharan (@AwanishSharan) June 12, 2022

त्याचवेळी आईच्या मांडीवर बसलेला निरागस मुलगा रस्त्यावर पडला. यानंतर एक बस अगदी वेगात मुलाच्या दिशेने आली. हे पाहून सुंदरलाल यांनी लगेच मुलाला रस्त्यावरून उचललं आणि सतर्कता दाखवत त्याचा जीव वाचवून त्याला त्याच्या आईकडे दिलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हँडल न पकडता रस्त्याच्या मधोमध चालवत होता दुचाकी; अचानक आरामात झोपला, VIDEO पाहून व्हाल शॉक हा व्हिडिओ शेअर करताना अवनीश शरण यांनी लिहिलं ‘ट्रॅफिक पोलीस जवान सुंदर लाल’. हा व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 1.4 मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, 78 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत सुंदरलाल यांची स्तुती करत आहेत.

Published by:Kiran Pharate

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.