Home » राष्ट्रीय » Pune ATS ची मोठी कारवाई, लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याला घातल्या बेड्या

Pune ATS ची मोठी कारवाई, लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याला घातल्या बेड्या

pune-ats-ची-मोठी-कारवाई,-लष्कर-ए-तोयबाच्या-दहशतवाद्याला-घातल्या-बेड्या

पुणे, 13 जून :  दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए-तोयबासाठी (Lashkar e taiba) काम करणाऱ्या तरूणाला पुण्यातील दहशतवादी विरोधी पथकानं (Pune ATS) उत्तर प्रदेशात अटक केली आहे. इमानूल हक (Inamul Haq) असं या तरूणाचं नाव असून त्याला उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आलेल्या बुलडाण्यातील जुनैद मोहम्मद या तरूणाला एटीएसनं यापूर्वी अटक केली होती. इमानूल त्याच्या संपर्कात होता.  त्याला पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कोण आहे जुनैद? दहशतवाद विरोधी पथकानं पुण्यात यापूर्वी अटक केलेला जुनैद मोहम्मद हा मुळचा बुलडाण्याचा आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 10 वी नापास असलेला जुनैद सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. तो लष्कर ए तोयबा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. पुण्यातील भवानी पेठेत झालेल्या स्फोटाचं गूढ वाढलं, फ्लॅटमध्ये सापडल्या संशयित वस्तू लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करण्यासाठी त्याला पैसे मिळत होते. जम्मू काश्मीरमधून पैसे मिळाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्याने 10 हजार रुपये घेतले होते. दिल्ली स्पेशल सेलने महाराष्ट्र एटीएसला जुनैद याच्यावर नजर ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर आठवडाभर चौकशी केल्यानंतर 10 हजार रुपये घेतल्याचं मोहम्मद जुनैद याने मान्य केलं. जुनैद आणि इमानूल हे दोघंही एकमेकांच्या संपर्कात होते. जुनैदच्या अटकेनंतर मिळालेल्या माहितीनुसार पुणे एटीएसनं इमानूलला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.

 • पुण्यात तृतीयपंथीयांचं ही निघणार Aadhaar Card, खास शिबिराचं आयोजन

 • राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा

 • Shocking VIDEO: रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक, बारामतीतील घटनेचा CCTV आला समोर

 • Engineer उमेदवारांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; पुण्यातील विद्यापीठात Vacancy; थेट होणार मुलाखत

 • BREAKING : पुण्यात तुर्तास राजगर्जना नाहीच! राज ठाकरेंची सभा रद्द

 • Love Marriage : प्रेमविवाहानंतर वैचारिक मतभेद, पुण्यातील दाम्पत्याला नऊ दिवसात घटस्फोट मंजूर

 • हा अनुभव जीवन बदलवून टाकणारा, रिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल

 • भाजप-राष्ट्रवादी राड्यानंतर आज दोन्ही पक्ष उतरले रस्त्यावर, पुण्यात नेमकं घडतंय तरी काय?

 • पत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगे; स्वत: कोपऱ्यात उभं राहून…,पुण्यातील किळसवाणा प्रकार!

 • जगू द्याल का नाही? राज ठाकरे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीवरच भडकले

 • Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यात 50 हजार रुपयांची पुस्तक खरेदी, 200 हून अधिक पुस्तके खरेदी, पाहा VIDEO

Published by:Onkar Danke

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: ATS, Pune, Terrorist, Uttar pardesh

Leave a Reply

Your email address will not be published.