Home » राष्ट्रीय » हरियाणातही महाराष्ट्रासारखाच ड्रामा, एका मतानं कसे हरले Congress चे माकन

हरियाणातही महाराष्ट्रासारखाच ड्रामा, एका मतानं कसे हरले Congress चे माकन

हरियाणातही-महाराष्ट्रासारखाच-ड्रामा,-एका-मतानं-कसे-हरले-congress-चे-माकन

हरियाणा, 11 जून: Haryana Rajya Sabha Election Result: चार राज्यांतील राज्यसभेच्या 16 जागांसाठी झालेल्या मतदानाचे निकाल जाहीर झाले आहेत. हरियाणाच्या (Haryana) निकालाने महाराष्ट्र, राजस्थान आणि कर्नाटकपेक्षा (Maharashtra, Rajasthan and Karnataka) जास्त आश्चर्यचकित केलं आहे. हरियाणात 2 जागांवर निवडणूक झाली. एका जागेवर भाजप (BJP) आणि दुसऱ्या जागेवर काँग्रेसचा (Congress) विजय निश्चित असल्याची अटकळ बांधली जात होती, मात्र येथे अपक्ष उमेदवारानं संपूर्ण निकालाचं फिरवला आहे. हरियाणात भाजपचे कृष्णलाल पनवार आणि अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा विजयी झाले आहेत. त्याचवेळी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेले ज्येष्ठ नेते अजय माकन यांना पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. अवघ्या एका मतामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. असं वळलं हरियाणातील मतांचं गणित राज्यसभा निवडणुकीत एक मत 100 इतके मानले जाते. काँग्रेसचे एक मत निवडणूक आयोगाने रद्द केलं होतं. त्यामुळे 88 मते शिल्लक होती, म्हणजे 8800 मते. विजयासाठी 8800/3+1 म्हणजेच 2934 मतांची गरज होती. भाजपचे कृष्णलाल पनवार यांच्या विजयानंतर 66 मते शिल्लक होती, जी कार्तिकेय यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली. केवळ एका मताने कार्तिकेय यांनी उलथला डाव कार्तिकेय शर्मा आणि अजय माकन यांना 29-29 (2900-2900) मते मिळाली. मात्र भाजपला 66 मते मिळाल्यानंतर कार्तिकेय यांची मते 2966 झाली आणि ते विजयी झाले. काँग्रेसचे एक मत अवैध ठरल्याने सारा खेळच उलटला. राजस्थान: भाजप आमदाराचे क्रॉस व्होटिंग राजस्थानमध्ये भाजपच्या आमदार शोभाराणी कुशवाह यांनी क्रॉस व्होटिंग करून काँग्रेस उमेदवार प्रमोद तिवारी यांना मतदान केले. याच मतांनी काँग्रेसचे प्रमोद तिवारी राज्यसभा निवडणुकीत विजयी झाले. सध्या प्रमोद यांचा दुसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मतदानानंतर क्रॉस व्होटिंग करणाऱ्या शोभाराणी कुशवाह यांना भाजपने पक्षातून निलंबित केले.

Published by:Maharashtra Maza News

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Election, Haryana, Rajyasabha

Leave a Reply

Your email address will not be published.