Home » राष्ट्रीय » Ranchi Violence: नमाज अदा केल्यानंतर झालेल्या हिंसाचारात 2 जण ठार, शहरात तणाव

Ranchi Violence: नमाज अदा केल्यानंतर झालेल्या हिंसाचारात 2 जण ठार, शहरात तणाव

ranchi-violence:-नमाज-अदा-केल्यानंतर-झालेल्या-हिंसाचारात-2-जण-ठार,-शहरात-तणाव

मुंबई, 11 जून : मोहम्मद पैगंबरांविरोधात (Prophet Muhammad) भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या वक्तव्याविरोधात शुक्रवारी देशभर हिंसाचार झाला. शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर संतप्त जमावानं हिंसक निदर्शनं केली. झारखंडची राजधानी रांचीमध्ये या हिंसाचाराच्या (Ranchi Violence) दरम्यान जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. रांचीतील राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) यांनी दोघांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. या प्रकरणात आणखी 8 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नुपूर शर्मांच्या विरोधात रांचीतील अनेक भागात जमावानं दगडफेक करत हिंसाचार केला. शहरातील मेन रोड भागात आंदोलनकांनी मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली, तसंच पुतळाही जाळला. यावेळी पाहता-पाहता हा जमाव हिंसक झाला. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार तसंच हवाई गोळीबार करावा लागला. Video : दगडफेक, लाठीचार्ज अन् गोळीबार; नमाज अदा केल्यानंतर मशिदीसमोर उडाला गोंधळ या जमावानं केलेल्या दगडफेकीमुळे अनेक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. या हिंसाचारानंतर शहरातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट कनेक्शन देखील बंद करण्यात आले आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.

#UPDATE | Jharkhand | Among injured brought to Rajendra Institute of Medical Sciences (RIMS) after the violence in Ranchi, two have succumbed to their injuries, confirmed RIMS authorities

— ANI (@ANI) June 11, 2022

#WATCH | Jharkhand: Protest over the controversial remarks by suspended BJP leader Nupur Sharma turned violent in Ranchi. Vehicles were torched and vandalised and stone-pelting occurred. Injuries reported. pic.twitter.com/Z5FIndjZzf

— ANI (@ANI) June 10, 2022

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) मुस्लीम समुदायाने विविध ठिकाणी आंदोलन केलं आहे. प्रयागराज, लखनऊ, मुरादाबाद आणि सहारनपूरमध्ये गोंधळ आणि घोषणाबाजी झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.