राणी एलिझाबेथच्या पॅलेस बाहेर कपल करु लागले अशी गोष्ट, ज्यामुळे झाले ट्रोल

राणी-एलिझाबेथच्या-पॅलेस-बाहेर-कपल-करु-लागले-अशी-गोष्ट,-ज्यामुळे-झाले-ट्रोल

लंडन 9 सप्टेंबर : ब्रिटनची राणी एलिझाबेथ-द्वितीय यांचे गुरूवारी निधन झाले आहे. ज्यामुळे ब्रिटनमध्ये शोककळा पसरली आहे. तसेच भारतासह इतर देशांचे राजकारण्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. एवढेच नाही तर गुरुवारी जेव्हा ही माहिती बकिंघम पॅलेसने दिली, तेव्हा हळूहळू लोक राजवाड्याच्या बाहेर जमू लागले. लोकांना शेवटचं क्वीन एलिझाबेथला भेटायचं होतं, ज्यामुळे लोकांनी तेथे गर्दी केली होती. पण या सर्वांमध्ये एक कपल चर्चेत आलं. लोकांनी या कपलला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

जेव्हा ब्रिटीश वृत्तवाहिनी ‘स्काय न्यूज’ बकिंघम पॅलेसच्या बाहेरील दृश्य दाखवत होती, तेव्हा तेथील लोकांना पावसातही छत्री घेऊन उभी असलेली आपली लाडकी राणी आठवत होती. तर काही लोकांचे अंतकरण भरुन आले होत, पण त्याचवेळी या चॅनलने बकिंगहॅम पॅलेन्सच्या बाहेर एका कपलकडे कॅमेरा वळवला. तेव्हा हे कपल त्या ठिकाणी एन्जॉय करताना दिसले.

हे कपल खूप आनंदी होते आणि ते कॅमेरा आपल्याकडे येतोय हे पाहाताच आनंदाने नाचू लागले आणि कॅमेराचं लक्ष आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करु लागले. हे जोडप सेल्फी घेताना अचानक नाचू लागले.

हे वाचा : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं वार्षिक उत्पन्न किती? हा निधी नेमका येतो कुठून?

ट्विटरवर एका यूजरने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती महिला मोबाईल कॅमेऱ्याचा फ्लॅश पेटवून हसत आणि सेल्फी घेताना दिसत आहे. ती न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर आल्याचे समजताच तिने डान्स करायला सुरुवात केली. खरंतर अशा दुखद प्रसंगी लोक अशापद्धतीने वागत आहेत, याला मुर्खपणाच म्हणावा लागेल.

@SkyNews take the camera of these rude idiots! Feeling the need to laugh and dance because they’re on tv pic.twitter.com/4cKA4rjLHb

— Gill morrissey (@Gillmorrissey3) September 8, 2022

हे वाचा : राणी एलिझाबेथनंतर ‘कोहिनूर’च्या वारसदाराचं रहस्य वाढलं, वाचा कुणाला मिळणार मुकुट!

व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने लिहिले की, स्काय न्यूजने या दोन मूर्खांसमोरचा कॅमेरा ताबडतोब काढून टाकायला हवा होता. तसेच लोक वेगवेगळ्या प्रकारचे निगेटीव्ह कमेंट करु लागले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *