राज्यात पुन्हा कोरोनाची धास्ती, सर्व मंदिरांमध्ये मास्कसक्ती? पाहा TV9 स्पेशल रिपोर्ट

राज्यात-पुन्हा-कोरोनाची-धास्ती,-सर्व-मंदिरांमध्ये-मास्कसक्ती?-पाहा-tv9-स्पेशल-रिपोर्ट

चीनमध्ये कोरोनाचे एकाच दिवसात कोट्यवधी रुग्ण सापडू लागले आहेत. केंद्र सरकारनंही राज्यांना कोरोनाबाबत सावध केलंय. त्यामुळं राज्यातल्या काही मंदिरांमध्ये मास्कची सक्ती करण्यात आलीय.

मुंबई : राज्यातल्या मंदिरांमध्ये मास्कसक्ती सुरु झालीय. चीनमधल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाची धास्ती अख्ख्या जगानं घेतलीय. आणि त्याचाच परिणाम म्हणून राज्यातली मंदिरांचं प्रशासन सावध झालंय. ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या आधी पर्यटनस्थळांवर गर्दी झालीय. मंदिरांमध्येही दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. पण असं असतानाच तिकडे चीनमध्ये कोरोनानं वर्दी दिलीय. चीनमध्ये कोरोनाचे एकाच दिवसात कोट्यवधी रुग्ण सापडू लागले आहेत. केंद्र सरकारनंही राज्यांना कोरोनाबाबत सावध केलंय. त्यामुळं राज्यातल्या काही मंदिरांमध्ये मास्कची सक्ती करण्यात आलीय.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पुजारी आणि कर्मचाऱ्यांना मास्क अनिवार्य करण्यात आलाय. भाविकांनाही मास्क वापरण्याचं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलंय.

शिर्डीच्या साई मंदिरात आणि शनिशिंगणापूरच्या मंदिरातही मास्कसक्ती करण्यात आलीय. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ही घोषणा केलीय.

तुळजाभवानी मंदिरातही कर्मचाऱ्यांना मास्कसक्ती करण्यात आलीय. भाविक मात्र मंदिरात विनामास्कच वावरत असल्याचं दिसतंय.

देहूच्या मुख्य मंदिरात भाविकांना अद्याप मास्कसक्ती करण्यात आलेली नाही. मात्र कोरोना नियमांचे पालन करण्याचं आवाहन संस्थानच्या वतीनं करण्यात येतंय.

अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिर मंदिरातही मास्क सक्ती करण्यात आलीय. भक्तांनी दर्शनासाठी मास्क घालूनच मंदिरात यावं असं आवाहन मंदिर प्रशासनानं केलंय.

खबरदारी म्हणून मंदिर समितीनं भक्तांना मास्कचं वाटपही केलंय.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानातही मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आलाय. मंदिरात येणाऱ्या भाविकांना मास्क परिधान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाशिक जिल्ह्यातल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठीही नो मास्क नो एन्ट्रीचा नियम करण्यात आलाय. सुरक्षित अंतर ठेऊनच भाविकांनी दर्शन घ्यावं असं आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आलंय.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आलीय. त्यामुळं कर्मचारी आणि पुजारी मास्क लावूनच कामावर येताना दिसतायत.

भाविकांना मात्र अद्याप मास्क सक्ती करण्यात आलेली नाही.

चीन, ब्राझील, अमेरिका, जपान, दक्षिण कोरियात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवलीय. त्यामुळं भारतात आत्तापासूनच खबरदारी घेतली जातेय.

पुन्हा लॉकडाऊन लागू नये, पुन्हा निर्बंध येऊ नयेत यासाठी आत्तापासूनच काळजी घेतली जातेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *