राज्यात ढगाळ वातावरण तर मुंबईत लागणार घामाच्या धारा, थंडी गायब

राज्यात-ढगाळ-वातावरण-तर-मुंबईत-लागणार-घामाच्या-धारा,-थंडी-गायब

मुंबई, 28 डिसेंबर : नाताळमध्ये थंडीत कमालीची वाढ झाल्याने राज्यात थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती परंतु ढगाळ वातावरणामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे. राज्यातील विविध राज्यातील बहुतांश तापमान 15 अंशांच्या वर गेले आहे. राज्याच्या किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान मुंबईत 18 अंशाच्या वर तापमान राहिल तर राज्यातील इतर ठिकाणी 15 अंशांच्या वर राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 27) उत्तर महाराष्ट्रातील निफाडच्या गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात 11 अंश सेल्सिअस तापमान नोंद करण्यात आली. 

हे ही वाचा : अख्ख गाव करतंय गाजराची शेती, कमी कालावधीमध्ये लाखोंचं उत्पन्न Video

Gradual rise in minimum temperatures as seen from the IMD GFS model guidance for Tmin for tomorrow morning, 28 Dec. Parts of N Mah & Pune ~12-14 Mumbai & around 18-20, S Konkan 20+ Vidarbha 18+ North also rise as compared to last 2,3 days, but still single digit possible. pic.twitter.com/CZdKzTx115

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 27, 2022

उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा 12 ते 20 अंशांच्या दरम्यान कायम होता. दिवसा उन्हाचा चटका कायम आहे. विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी 33.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सातत्याने 30 अंशांच्या पार आहे. मालदीव आणि कोमोरीन भागातील कमी दाब क्षेत्र निवळले आहे.

पाकिस्तानातून उत्तर भारतात येणाऱ्या पश्चिमी चक्रवातामुळे जम्मू काश्मीर, लडाख,पंजाब, हिमाचल या भागात कडाक्याची थंडी पडत आहे. तिकडून येणाऱ्या शीत वाऱ्यामुळे गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात किमान तापमानात घसरण झाली आहे. शनिवारी किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घसरण झाली. निफाड येथे 7.8 अंश, धुळे येथे 8.4 अंश सेल्सिअस निचांकी नोंद झाली आहे. 

हे ही वाचा : राज्यात कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा, इथं चेक करा तुमच्या शहरातील तापमान

राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील आणि कोकणातील काही भागात 24 ते 31 डिसेंबरपर्यंत गारठा जाणवण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर, एक जानेवारीपासून राज्यात कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे. तसेच, यंदा कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्येही थंडी अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *