राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी; मुख्य युक्तीवादाबाबत मोठा निर्णय?

राज्याच्या-सत्तासंघर्षावर-आज-सुनावणी;-मुख्य-युक्तीवादाबाबत-मोठा-निर्णय?

राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी; मुख्य युक्तीवादाबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता!

एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे

एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीमध्ये मुख्य युक्तीवादाबाबतची तारीख निश्चित करण्यात येणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.  ख्रिसमसची सुट्टी लागण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात आज नव्या वर्षात होणाऱ्या मुख्य युक्तीवादाबाबतची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे. घटनापीठासमोर आजची सुनावणी होणार असून, जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुख्य युक्तिवादाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे.  आज सुनावणी झाल्यास घटनापीठ काय निर्णय देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ठाकरे गटाची याचिका  

चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायाला मिळाली होती. एकनाथ शिंदे यांनी उठाव केला.  त्यानंतर त्यांना शिवसेनेच्या अनेक आमदारांचा पाठिंबा मिळाला. याच आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आणि भाजपच्या मदतीने सरकार देखील स्थापन केले. मात्र हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यांनी सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्या हे प्रकरण घटनापिठाकडे वर्ग करण्यात आले आहे.

हेही वाचा :  …तर फडणवीसांची हत्तीवरून मिरवणूक काढणार; पंढरपूरमधील नागरिकांचा मोठा निर्णय

आज सुनावणीची शक्यता  

दरम्यान आज राज्याच्या सत्तासंघर्षावर घटनापीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. ख्रिसमसची सुट्टी लागण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात आज नव्या वर्षात होणाऱ्या मुख्य युक्तीवादाबाबतची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.  जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुख्य युक्तिवादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता घटनापीठ काय निर्णय देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Eknath Shinde, Shiv sena, Supreme court, Uddhav Thackeray

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *