राजकारणासाठी वारकऱ्यांचा वापर; शरद पवार यांची सकाळी सकाळीच वारकऱ्यांशी तासभर चर्चा

राजकारणासाठी-वारकऱ्यांचा-वापर;-शरद-पवार-यांची-सकाळी-सकाळीच-वारकऱ्यांशी-तासभर-चर्चा

शरद पवार थोड्याच वेळात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाणार आहेत. मंगेशकर रुग्णालयात भाजपचे खासदार गिरीश बापट यांची घेणार भेट आहेत.

राजकारणासाठी वारकऱ्यांचा वापर; शरद पवार यांची सकाळी सकाळीच वारकऱ्यांशी तासभर चर्चा

राजकारणासाठी वारकऱ्यांचा वापर; शरद पवार यांची सकाळी सकाळीच वारकऱ्यांशी तासभर चर्चा

Image Credit source: tv9 marathi

पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यात वारकरी अत्यंत आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा जुनी व्हिडीओ क्लिप व्हायरल करून त्याविरोधात वारकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. राज्यात वारकऱ्यांचा राजकारणासाठी वापर होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारकऱ्यांची तातडीने बैठक बोलावली होती. आज सकाळी सकाळीच पवारांनी ही बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना संयमाचा सल्लाही दिला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सकाळीच पुण्यात वारकऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीला ज्येष्ठ वारकरी उपस्थित होते. यावेळी वारकऱ्यांनी आपलं म्हणणं पवारांसमोर मांडलं. तर पवारांनीही वारकऱ्यांची भूमिका समजून घेतली. तब्बल तासभर ही चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते.

राजकारणासाठी वारकऱ्यांचा वापर सुरू आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाली. तसेच सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यामुळे वारकरी संतप्त झाले आहेत. त्यावरही या बैठकीत चर्चा झाली. सुषमा अंधारेंचा वाद राज्यात चर्चेत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली. दरम्यान, शरद पवार यांनी वारकऱ्यांचं प्रत्येक म्हणणं जाणून घेतलं. त्यावर मार्गदर्शनही केलं. वारकरी संप्रदायाबाबतच्या साहित्याचा खरा प्रचार व्हावा, असा सल्ला शरद पवार यांनी यावेळी वारकऱ्यांना दिला.

दरम्यान, शरद पवार थोड्याच वेळात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाणार आहेत. मंगेशकर रुग्णालयात भाजपचे खासदार गिरीश बापट यांची घेणार भेट आहेत. काही दिवसांपासून गिरीश बापट दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. बापट यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार दीनानाथ रुग्णालयात जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी त्यांच्या त्या व्हिडीओवरून दिलगिरी व्यक्त केलेली आहे. सुषमा अंधारे यांचा तो व्हिडीओ दहा वर्षांपूर्वीचा आहे. या व्हिडीओवरून वारकरी संतप्त झाले आहेत. मात्र हे सर्व वारकरी भाजप समर्थक आहेत. त्यामुळे सुषमा अंधारेही या वारकऱ्यांविरोधात आक्रमक झालेल्या दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *