रंगकर्मी प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार विठ्ठल पांचाळ यांना जाहीर

लातूर

 

 

औसा (प्रतिनिधी ज्ञानेश्वर सूर्यवंशी)

रंगकर्मी साहित्य कला कला क्रिडा प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरिय पत्रकारिता पुरस्कार दै आनंद नगरी चे तालुका प्रतिनिधी पांचाळ विठ्ठल यांना जाहीर झाला असून त्याच्या वर अभिनंदना चा वर्षाव होत आहे.

रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीने मागील पाच वर्षापासुन राष्ट्रीय लघुपट महोत्सव , आरोग्य शिबीरे , विविध क्षैञातील मान्यवरांचा सन्मान अशा विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते . यावर्षी पासुन राज्यस्तरिय उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता या दोन गटातून पञकारिता पुरस्काराचे आयोजन केले आहे
शोध वार्ता गटातून औसा जि. लातूर येथील दै आनंद नगरी चे तालुका प्रतिनिधी पांचाळ विठ्ठल यांच्या “विठ्ठला कोणता पेरा घेऊ हाती “‘ या बातमीची निवड झाली असून येणाऱ्या 20/02/2021 रोजी दु 3:30 मिनिटांनी रघुकुल मंगल कार्यालय उदगीर येथे रंगकर्मी प्रतिष्ठान आयोजित लघु पट महोत्सव पारितोषक वितरण सोहळा संपन्न होणार असून त्यामध्ये पुरस्कार जाहीर झाले त्या पुरस्कार प्राप्त मान्यवर यांचा रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे म्हणून परिवेक्षक रसुल पठाण , कवि व कथाकार प्रा रामदास केदार ,लक्ष्मण बेंबडे यांनी काम पाहिले
पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित रहाण्याचे आवाहन रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा बिभीषण मद्देवाड , अॅड विष्णू लांडगे, अॅॅड महेश मळगे ,प्रा डाॅ संग्राम गायकवाड ,प्रा प्रल्हाद येवरीकर ,मारोती भोसले , महादेव खळूरे , जहाँगीर पटेल , रामेश्वर पटवारी ,अनमोल कवडेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *