युनियन जॅक उतरला, पण क्वीन एलिझाबेथ अजूनही या 15 देशांच्या 'सम्राज्ञी'

लंडन, 8 सप्टेंबर : ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ (Queen Elizabeth Death) द्वितीय यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. 96व्या वर्षी एलिझाबेथ यांनी अखेरचा श्वास घेतला. विस्टन चर्चील ते लिस ट्रस हे युकेचे 15 पंतप्रधान एलिझाबेथ यांनी बघितले. ब्रिटीश साम्राज्य ते कॉमनवेल्थ, शितयुद्ध, ब्रिटनची युरोपमध्ये एण्ट्री आणि ब्रेक्झिट तसंच कोरोनाची महामारी हे सगळं क्वीन एलिझाबेथ यांनी त्यांच्या हयातीत पाहिलं. 1952 साली वयाच्या 25व्या वर्षी क्वीन एलिझाबेथ ब्रिटनच्या महाराणी झाल्या. क्वीन एलिझाबेथ या अजूनही 15 देशांच्या सम्राज्ञी आहेत. ब्रिटीश साम्राज्याखाली असलेल्या पण आता स्वातंत्र्य मिळालेल्या या 15 देशांच्या एलिझाबेथ राणी होत्या. 2021 साली बारबाडोस क्वीन एलिझाबेथ यांच्या राज्यातून बाहेर पडलं.
क्वीन एलिझाबेथ या फक्त युकेच नाही तर ऍण्टिग्वा ऍण्ड बारबुडा, ऑस्ट्रेलिया, बेलिझ, कॅनडा, ग्रेनेडा, जमैका, न्यूझीलंड, पपुआ न्यू गिनी, सेन्ट किट्स, सेंट लुसिया, सेन्ट विनसेन्ट आणि ग्रेनेडाईन्स या कॉमनवेल्थ क्षेत्रांच्या त्या प्रमुख होत्या.
क्वीन एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर सिंहासन कोणाला? कॅमिलाना मिळणार नाही राणी व्हायचा मान, कारण…
हे सगळे देश एकेकाळी ब्रिटीश साम्राज्याखाली असले तरी आज स्वतंत्र आहेत, पण तरीही राणीचा या देशांमधला रोल वादग्रस्त राहिला आहे, कारण यातल्या बऱ्याच जणांनी ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध लढून स्वातंत्र्य मिळवलं आहे. या देशांमधले राणीचे अधिकारी हे फक्त सांकेतिक आहेत, देशाचे सगळे महत्त्वाचे निर्णय संसद आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधीच घेतात, म्हणजेच क्वीन एलिझाबेथ या या देशांच्या प्रमुख असल्या तरीही त्या या देशांमधल्या सरकारच्या प्रमुख नव्हत्या.
क्वीन एलिझाबेथ यांना या देशांमध्ये संविधानिक कर्तव्य होती, ज्यात नव्या सरकारला मान्यता देण्याचाही समावेश होता. यातल्या काही देशांमध्ये तर राणी कायदे अधिकृतरित्या मंजूर करणे, अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे तसंच राजसन्मान देणं हे अधिकारही होते.
ब्रिटनमध्ये काय बदल होणार?
क्वीन एलिझाबेथ यांच्या मृत्यूमुळे आता ब्रिटनमध्येही काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. ब्रिटनला राणीच्या मृत्यूमुळे राष्ट्रगीत, पासपोर्ट, पोलीस गणवेश तसंच चलनही अपडेट करावं लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.