'या सीझनचं सगळंच गंडलंय'; BBM 1ची विनर मेघा धाडेची रिअ‍ॅक्शन

'या-सीझनचं-सगळंच-गंडलंय';-bbm-1ची-विनर-मेघा-धाडेची-रिअ‍ॅक्शन

मुंबई, 20 डिसेंबर :   टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त्र शो म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात ते म्हणजे बिग बॉस. बिग बॉस हिंदी नंतर मराठीतही बिग बॉस सुरू करण्यात आलं. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनबाबत प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन पाहून फेअर आणि अनफेअरवरून सोशल मीडियावर चांगलंच ट्रोलिंग सुरू आहे. प्रेक्षक बिग बॉस मराठीविषयी बोलतच आहेत मात्र बिग बॉसच्या काही स्पर्धकांनीही याला समर्थन दिलं आहे. ‘यंदाचं बिग बॉस गंडलंय’, अशी प्रतिक्रिया स्वत: बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे हिनं दिली आहे. मेघाची ही प्रतिक्रिया सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत असून याची सर्वत्र चर्चा होत आहे.

मेघा धाडे ही बिग बॉसची हार्डकोर फॅन आहे. हिंदी असो किंवा मराठी बिग बॉसचा एकही एपिसोड ती चुकवत नाही. बिग बॉसचा गेम कसा खेळायचा आणि प्रेक्षकांचं मनोरंजन कसं करायचं हे तिला पूर्णपणे माहिती आहे. अनेक वर्ष बिग बॉसची फॅन असल्याचा फायदा तिला घरात गेल्यावर झाला. मेघानं बिग बॉसचा पहिला सीझन चांगलाच गाजवला आणि मराठी बिग बॉसच्या इतिहासातील ती पहिली विजेती ठरली. मेघा बिग बॉसच्या चौथा सीझनही फॉलो करते. घरातील अनेक सदस्यांना तिनं पाठिंबा दिला आहे. मागच्या आठवड्यात अभिनेत्री अमृता देशमुख घरातून बाहेर गेली तेव्हा मेघानं यावर तिचं मतं मांडलं.

हेही वाचा – अखेर BBM4चा प्रेक्षकांना रामराम! या दिवशी होणार ग्रँड फिनाले

मागील आठड्यात अमृता देशमुख घराबाहेर आल्यानं सर्वांनी नाराजी व्यक्त केली. घराबाहेर अमृताला फॉलो करणारा मोठा चाहता वर्ग आहे. अमृताला अपूर्वापेक्षा जास्त मतं मिळाल्याचं देखील म्हटलं गेलं. घरात चांगला गेम खेळून आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करूनही अमृता घराबाहेर काढणं हे प्रेक्षकांप्रमाणे मेघा देखील पटलं नाही.

घराबाहेर आल्यानंतर अमृतानं प्रेक्षकांचे आभार मानणारी पोस्ट लिहिली, तिनं म्हटलं होतं, ‘बिग बॉस मराठीच्या या टप्प्यावर बाहेर पडल्याच्या दु:खातून मी अजून बाहेर पडले नाहीये, थोडक्यात ऑल इज नॉट वेल. काय चूक, काय बरोबर, कोण फेअर, कोण अनफेअर, हे एनलिसेस तेव्हाही सुरू होतं आणि आताही सुरू आहे. पण तुमच्या प्रेमामुळे आतमध्ये असताना मजा ऊर्जा मिळत होती आणि त्याच गोष्टीमुळे आतासुद्धा मिळतेय.So Shower Some More Positivity in the comment secion म्हणजे सगळं वाटेल All is Well’.

अमृताच्या या पोस्टवर मेघानं कमेंट करत म्हटलंय, ‘या सीझनचं सगळंच गंडलंय. आणखी एक अनफेअर इविक्शन. पण तू निराश होऊ नकोस. तू खूप छान खेळलीस. बिग बॉसच्या घराबाहेर एक मोठा चाहता वर्ग आहे जो तुझ्यावर प्रेम करतोआणि तुझ्या प्रामाणिकपणाची आणि प्रयत्नांची कदर करतो. तू चांगल्या मनानं काम करत राहा. पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि प्रेम’.

मेघा प्रमाणेच बिग बॉसचेच स्पर्धक अभिनेत्री रुपाली भोसले, आदिश वैद्य यांनाही मेघाच्या म्हणण्याला सहमती दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *