मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या

- मुख्यपृष्ठ
- बातम्या  / भंडारा
- शिंदे गटाच्या विदर्भातील पहिल्या कार्यालयावर अतिक्रमणाची कारवाई, मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीचं केलं होतं उद्घाटन
शिंदे गटाच्या विदर्भातील पहिल्या कार्यालयावर अतिक्रमणाची कारवाई, मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीचं केलं होतं उद्घाटन
शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या भंडाऱ्यातील कार्यालयाचे अतिक्रमण काढले . शहरातील सुमारे 200 पेक्षा अधिक अतिक्रमण हटविले आहेत.
By: प्रशांत देसाई | Updated at : 27 Dec 2022 12:09 AM (IST)
Edited By: निलेश झालटे
bhandara news latest updates
Bhandara News Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे (cm eknath shinde group) भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) यांच्या कार्यालयाचे अतिक्रमण काढण्यात आले. भोंडेकर यांच्या कार्यालयाच्या समोरील शेड अतिक्रमणात होते. आज भंडारा नगर पालिकेने शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली, त्यात भंडारा शहरातील अनेकांचे अतिक्रमण काढताना आमदार भोंडेकर यांच्या कार्यालयाचेही अतिक्रमित टिनाचे शेड काढण्यात आले.
भंडारा नगर पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहीमेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकातील नगर पालिकेच्या गांधी विद्यालयाच्या समोरील गाळ्यात आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या समोरील भागात त्यांनी टिनाचे शेड उभारले असून ते अतिक्रमणात होते. राज्यात सत्तांतर झाल्यावर भंडाऱ्याचे आमदार हे शिंदे गटात गेले. राज्यात शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर 12 नोव्हेंबरला ते भंडाऱ्यात आले होते. यावेळी आमदार भोंडेकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले होते, हे विशेष. पूर्व विदर्भातील शिंदे गटाचे ते पहिले कार्यालय ठरले आहे. या कार्यालयावर अतिक्रमणाची कारवाई झाल्याने नागरिक समाधानी आहेत.
मागील अनेक दिवसांपासून शहरातील प्रत्येक मार्गावर छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. यात काही मोठ्या व्यापाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे अनेकदा छोटे मोठे अपघातही घडलेले आहे. शहरात वाढत असलेल्या अतिक्रमणावर बुलडोझर चालणार असून नागरिकांनी अतिक्रमण स्वतः काढावे अन्यथा बुलडोझर चालणार असे आवाहन केले होते. त्यामुळे काहींनी त्यांचे अतिक्रमण काढले तर, ज्यांचे अतिक्रमण आहे, अशांवर बुलडोझर चालविण्यात आले.
भंडारा शहरातील विविध ठिकाणचे अतिक्रमण हटाव मोहिम
News Reels
भंडारा शहरातील विविध ठिकाणचे अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत असून सुमारे 200 पेक्षा अधिक अतिक्रमण हटविण्यात आले, त्यात भोंडेकर यांच्या कार्यालयाचे अतिक्रमण काढले. भंडारा पालिकेने पोलीस बंदोबस्तात सकाळपासून शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली. अनेकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढले त्यामुळे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या कार्यालयाचे अतिक्रमण काढतील का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, मोहिमेतील अधिकाऱ्यांनी बुलडोझर चालणार तेवढ्यात, कार्यालयातील उपस्थितांनी पुढाकार घेत स्वतः टिन शेड काढले.
नागरिकांनी समाधान व्यक्त केले
आजपासून भंडारा शहरातील विविध ठिकाणचे अतिक्रमण हटाव मोहिम भंडारा शहरात राबविण्यात येत असून सुमारे 200 पेक्षा अधिक अतिक्रमण हटविण्यात आले, त्यात भोंडेकर यांच्या कार्यालयाचे अतिक्रमण काढले. विशेष म्हणजे, शिंदे गटाचे पूर्व विदर्भातील भंडारा येथील हे पाहिले जिल्हा कार्यालय असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 नोव्हेंबरला या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. सर्वसामान्य नागरिकांच्या अतिक्रमणासोबतच आमदार भोंडेकर यांच्या कार्यालयाचे अतिक्रमण काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
ही बातमी देखील वाचा
मंत्री दादा भुसेंनी युवकाला पोलिसांसमोर फटकावलं; जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडीओ ट्वीट करत हल्लाबोल