मुख्यमंत्र्यांचं तोंड बंद का? शिंदे गटांचं चिन्ह कुलूप पाहिजे, संजय राऊत कडाडले

मुंबई, 10 डिसेंबर : ‘शिंदे गटांचं चिन्ह कुलूप असायला हवे, महाराष्ट्राच्या प्रश्नावर तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. त्यांच्या च्याव्या दिल्लीत आहेत. त्यांनी चावी दिली की ते बोलतात’ असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये सीमावाद कमालीचा पेटला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला इशारा दिला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
(अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीच! शिंदेंनी सोपवली इतर मंत्र्यांवर जबाबदारी)
कर्नाटक मुद्द्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करत आहे. अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री यांनी कर्नाटक विषयांवर तोंड उघडले नाही. महाराष्ट्राचे शिंदे गटाचे पळकुटे खासदारांनी कर्नाटकच्या मुद्यावर संसदेत तोंड ही उघडले नाही. शिवसेनेचे खासदार आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी जोरदार बाजू लावली पण भाजप आणि शिंदे गटाच्या एकाही खासदाराने तोंड उघडलं नाही, अशी टीका राऊत यांनी केली.
‘कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणताय कुणाशी बोला, मग अमित शहा मध्यस्थी कसली करणार आहे. मुख्यमंत्री यांनी ठाम भूमिका घ्यावी अशी अपेक्षा असते. पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या तोंडाला कुलूप लावला आहे. चाबी दिल्लीत आहे. महाराष्ट्राची अपमान करावा अश्या प्रकारचे षडयंत्र आहे, अशी टीका राऊत यांनी शिंदेंवर केली.
(‘तुम्ही कोणालाही भेटा…,’ कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा शिंदे सरकारला पुन्हा थेट इशारा)
‘ज्या पक्षाचे नेते ज्या पक्षाचे नेते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या अपमान करतात. लोकवर्गणीतून शाळा कॉलेज उभारले. मग तुम्हाला मिळालेले खोके भीक आहे का? हे सरकार भिकारी आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.
‘शिंदे गटांचं चिन्ह कुलूप असायला हवे, महाराष्ट्राच्या प्रश्नावर तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. त्यांच्या च्याव्या दिल्लीत आहेत. बोम्मई हे अमित शहांचं ऐकणार नाही म्हणतात तर ते शहांनी मध्यस्थी करून काय फायदा होणार आहे? असा खोचक सवालही संजय राउतांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.