Home » मुंबई » Video : मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणापूर्वीच नवनीत राणांच्या घराबाहेर भजन-कीर्तन

Video : मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणापूर्वीच नवनीत राणांच्या घराबाहेर भजन-कीर्तन

video-:-मातोश्रीवर-हनुमान-चालीसा-पठणापूर्वीच-नवनीत-राणांच्या-घराबाहेर-भजन-कीर्तन

मुंबई, 22 एप्रिल : खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या खार येथील घराबाहेर शिवसैनिकांचं किर्तन भजन सुरू आहे. आज रात्रभर राणा दांपत्यच्या घराबाहेर शिवसैनिक पहारा देत बसून राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे राणा राहतात त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या घराबाहेर टाळ मृदुंग घेऊन शिवसैनिक बसले आहेत. पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्याने उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर शिवसैनिक संतापले असून विविध मार्गातून ते राणा दाम्पत्याचा विरोध करीत आहेत. आमदार रवी राणा यांनी मुंबई येथील मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करणार अशी भूमिका घेतल्यानंतर अमरावतीतील शिवसैनिक आक्रमक झाले. आमदार रवी राणा यांनी आज रेल्वेने मुंबईकडे जाणार अशी भूमिका घेतली होती, दरम्यान आमदार रवी राणा 21 एप्रिलच्या रात्रीच मुंबईत पोहोचले. त्यामुळे शिवसैनिक चिडलेत. हे ही वाचा-राज्यात अराजकता माजण्याची भीती, गृहमंत्र्यांच्या बैठकांवर बैठका, विरोधकांसोबतही करणार बातचित

नवनीत राणा यांच्या खार येथील घराबाहेर शिवसैनिकांचं भजन-कीर्तन pic.twitter.com/A1wj2qv9dU

— News18Lokmat (@News18lokmat) April 22, 2022

याबाबत शिवसैनिक म्हणाले की, आमदार रवी राणा भगोडा आहे. नौटंकी करतात तरी देखील आम्ही अमरावती रेल्वे स्टेशन व त्यांच्या कार्यकर्त्यांना शोधतोय, अशी शिवसेनेचे पराग गूढधे यांनी दिली. तर इतर रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावती रेल्वे स्टेशनवर येत राणा विरोधात घोषणाबाजी दिल्या.

 • कोकणात अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ; आंबा, काजू बागायतदारांचं मोठं नुकसान

 • Top Schools in MH: पालकांनो, नवी मुंबईत मुलांसाठी आहेत अनेक शाळा; इथे बघा टॉप 5 लिस्ट

 • Maharashtra MP Fund: महाराष्ट्रातील खासदारांनी खर्च केलेल्या निधीची आकडेवारी आली समोर, ‘या’ भाजप खासदाराने एक रुपयाही केला नाही खर्च

 • खा. नवनीत राणा करणार मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण, अन् शिवसेनेकडून महाप्रसाद!

 • Maharashtra Load Shedding : महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी! राज्यावर वीजसंकट, लोडशेडिंग सुरु होणार

 • गोल्डन चान्स! कोंकण कृषी विद्यापीठात तब्बल 31,000 रुपये पगाराची नोकरी; अर्जाला अवघे 3 दिवस शिल्लक

 • भोंग्यांवर करडी नजर, राडा-दंगलींवर टाच, सुरक्षेसाठी शहरात गल्लोगल्लीत पोहोचणार मुंबई पोलीस

 • मुंबईकरांसाठी यंदाचा पावसाळा ठरणार अवघड, समुद्रात लाटांची असणार अशी अवस्था

 • JOB ALERT: राज्यातील ‘या’ महापालिकेत विविध पदांच्या 37 जागांसाठी भरती; लगेच पाठवा अर्ज

 • Video : मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणापूर्वीच नवनीत राणांच्या घराबाहेर शिवसैनिकांचं भजन-कीर्तन

 • मोठी बातमी, राज्यावर लोडशेडिंगचे संकट अटळ, मुख्यमंत्र्यांनीही दिला काटकसरीचा सल्ला

Published by:Meenal Gangurde

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.