Home » मुंबई » 'मला प्रत्येक पक्षाची ऑफर आली, पण…', थेट मंचावरुन वसंत मोरेंचं मोठं विधान

'मला प्रत्येक पक्षाची ऑफर आली, पण…', थेट मंचावरुन वसंत मोरेंचं मोठं विधान

'मला-प्रत्येक-पक्षाची-ऑफर-आली,-पण…',-थेट-मंचावरुन-वसंत-मोरेंचं-मोठं-विधान

ठाणे, 12 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केलेले पुण्याचे मनसे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) आज ठाण्यात मनसेच्या उत्तर सभेला हजर आहेत. या सभेत सुरुवातीलाच आज त्यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी गेल्या चार-पाच दिवसांपासून आपल्यासोबत घडलेल्या घटनांची थोडक्यात माहिती दिली. विशेष म्हणजे गेल्या चार-पाच दिवसात आपल्याला सर्वच पक्षांनी पक्षप्रवेशासाठी ऑफर दिली. पण आपण गेलो नाहीत, असं विधान मोरेंनी केलं. यावेळी मोरेंनी कार्यकर्त्यांना मनापासून काम करण्याचं आवाहन केलं. वसंत मोरे नेमकं काय म्हणाले? “गेल्या चार-पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रातील एकही पक्ष असा राहिला नसेल ज्याने मला पक्षप्रवेशाची ऑफर दिली नाही. आपण सर्वांनी एक गोष्ट घेतली पाहिजे, जर मनसेचा नगरसेवक इतकं चांगलं काम करतो, त्याला सगळ्या पक्षातून ऑफर येतात, तर राज ठाकरेंच्या हातात राज्याची सत्ता दिली तर मनसेच्या नगरसेवकांना अमेरिकेतून फोन येतील. आपल्या लोकांना तिकडे बोलवून घेतील. आपण कशाप्रकारे काम करतो हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी उपकार मानतो. आपण राज ठाकरेंच्या आदेशाने काम करुयात. माझ्या एकनिष्ठेला तुम्ही जो पाठिंबा दिला त्याबद्दल आभार मानतो”, असं वसंत मोरे आपल्या भाषणात म्हणाले. वसंत मोरे आणखी काय म्हणाले? जवळपास दोन वर्षाच्या कालावधीनंतर आपण एकत्र येतोय. त्यानंतर आपण आज पुन्हा एकदा उत्तर सभेसाठी ठाण्यात एकत्र येतोय. दोन वर्षाच्या कोरोना संकट काळ आपण बघितला. या कोरोना काळात आपल्या तोंडाला मुसक्या लावलेल्या होत्या. त्या मुसक्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून निघाल्या. त्यानंतर आपल्या सर्व सणांच्या उत्साहाला सुरुवात झाली. त्यानंतर आपला पाडवा मेळावा झाला. आज खरंतर आपण सर्वजण इथे आहोत हीच खरी अर्थाने आनंदाची बाब आहे. आपण सर्वांनी परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत कारण कोरोना काळात आपण जवळचे माणसं गमावले. मला तो काळ आठवला की अंगावर काटा येतो. आमचे पुण्याचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत. पुण्यात कोरोना काळात सरकारच्यावतीने अपेक्षित कामं झाली नाहीत. पण पुणे महापालिका क्षेत्रात मनसे काम करत होती. सर्व पक्षाचे नेते कोरोना काळात घरात बसलेले असताना मनसे कार्यकर्ते मदतीसाठी घराबाहेर होते. आम्ही आवाज उचलला. एक इम्बॅसिडरची काच फोडली त्याचा आवाज राज्यभरात आला. जिथे ऑक्सिजनची गरज होती तिथे आमचा प्रत्येक मनसैनिक जात होता. सरकारने जी कामं करायची होती ती काम मनसैनिक करत होती. सरकार मागं पडत होतं त्यावेळी आम्ही लोकांसाठी दवाखाने उभे केली. आम्ही खऱ्या अर्थाने जे काम केलं, गोरगरिबांना फायनान्स वाल्यांनी, बँकवाल्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली, अशावेळी कुणाची दारं उघडी होती? तर फक्त मनसेची! फायनान्सवाला दारात आला किंवा बँकवाला दारात आला की मनसेवाला आठवतो. कुणाचे पैसे अडकले असतील तो वसुलीला आला की मनसे आठवते. ज्यावेळा निवडणुका लागतात त्यावेळेस मनसेवाल्याचा विचार का होत नाही? त्यावेळेस मनसेवाला कुठे जातो? आपण या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. मी वर्षभरापासून राज ठाकरेंना पाहतोय. त्यांच्या तब्येतीत अडचणी असताना ते प्रत्येक शाखाध्यक्षाच्या घरी गेले. आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. राज ठाकरे करतात तर आपण कशाप्रकारे करतो. राज ठाकरेंच्या ब्लूप्रिंटने काय केलंय ते पुण्याच्या दोन नगरसेवकांच्या वार्डमध्ये येऊन बघा. पण आजसुद्धा पुणे शहरात आम्ही दोन नगरसेवकांनी काम केलं. चर्चेतील चेहरा हा पुरस्कार मनसे नगरसेवकांना मिळाला. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम केलं पाहिजे.

आपण गाण्यापुरता मर्यादित राहणार आहोत का? आपल्याला अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचं काम लोकांपर्यंत पोहोचवणारा आहोत की नाही? मी सोळा वर्षात सोळा गार्डन करणारा मी एकमेव नगरसेवक आहे. जिथे जिथे मनसे नगरसेवक काम करतात तिथे प्रत्येकाने त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आपल्याला काम करायला पाहिजे.

 • IPL 2022 : 7 ओव्हरमध्येच मुंबईने गमावली मॅच, रोहितच्या टीमचा पराभवाचा ‘सिक्सर’

 • मोठी बातमी, अनिल देशमुख यांचा जामिनासाठी मार्ग मोकळा, न्यायालयात घडली महत्त्वाची घडामोड

 • नवनीत राणांचं शिवसैनिकांना ओपन चॅलेंज, “तुम्ही तारीख आणि वेळ सांगा, मी मातोश्रीवर येते”

 • 5 मिनिटांमुळे 5 वर्षांची प्रतीक्षा वाया? मेगा ब्लॅाकमुळे उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेला उशिरा पोहोचलेल्या पोलिसांना फटका 

 • Sanjay Raut vs MNS: “याची पुनरावृत्ती हवी का? तर मनसे स्टाईलने तुमचा भोंगा आम्ही बंद करु” राऊतांच्या विरोधात मनसेचे बॅनर

 • Mumbai Train Accident: रेल्वे अपघाताचा परिणाम; आज लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल

 • मुंबईत मोठी दुर्घटना, 2 एक्स्प्रेस गाड्या एकमेकांना धडकल्या, घटनास्थळाचा पहिला VIDEO

 • मोठी बातमी! दादर रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसचे तीन डब्बे रेल्वे रुळावरुन घसरले

 • ‘छेडोगे तो छोडेगे नही’, मुंब्र्यात पीएफआयचा मनसेला इशारा

 • Kirit Somaiya: नंदकिशोर चतुर्वेदी याच्या कंपन्यांची यादी जाहीर करत किरीट सोमय्यांचा थेट ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप

 • Thane Crime: सोसायटीच्या आवारात खेळल्याचा राग, वकिलाकडून 10 वर्षीय मुलाला बेदम मारहाण, घटना CCTV मध्ये कैद

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed