Home » मुंबई » Mumbai Local: सकाळी हार्बररेल्वेची वाहतूक विस्कळीत,आता धक्कादायक माहिती आली समोर

Mumbai Local: सकाळी हार्बररेल्वेची वाहतूक विस्कळीत,आता धक्कादायक माहिती आली समोर

mumbai-local:-सकाळी-हार्बररेल्वेची-वाहतूक-विस्कळीत,आता-धक्कादायक-माहिती-आली-समोर

Home /News

/mumbai

/

Mumbai Local: सकाळी हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, समाजकंटकांनी सिग्नल वायर, लोकेशन बॉक्स तोडल्याचं उघड

Mumbai Local: सकाळी हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, आता धक्कादायक माहिती आली समोर

Mumbai Local Train: हार्बर रेल्वेची वाहतूक सेवा सकाळी विस्कळीत झाली होती. पनवेल जवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकलची वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 13 एप्रिल : हार्बर लोकलची रेल्वे सेवा (Harbor local service) सकाळच्या सुमारास विस्कळीत झाली होती. पनवेल रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड (Signal service disturbed) झाल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. यानंतर तात्काळ रेल्वे विभागाकडून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आणि त्यानंतर काही वेळाने ही सेवा सुरळीत सुरू झाली. मात्र, या प्रकरणात एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. या संदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यानुसार, काही सजमाकंटकांनी सिग्नल यंत्रण, लोकेशन बॉक्स आणि केबलचं नुकसान केलं असल्याचं म्हटलं आहे. तसेच पनवेल रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या या प्रकारामुळे हार्बर रेल्वेची सीएसएमटी आणि ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल सेवा काही काळ ठप्पही झाली होती.

  Location box having signalling items near track at Panvel km 48/13 and cables have been damaged and by miscreants. Signalling system near Panvel got disturbed and trains were running on paper authority from early morning. Location box 👇 pic.twitter.com/hzDWYhJAw8

  — Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) April 13, 2022

  सकाळी 7 वाजून 05 मिनिटांच्या सुमारास दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत झाली असंही मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. घटनास्थळावरचे फोटोजही मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट केले आहेत. या फोटोजमध्ये दिसत आहे की, कशाप्रकारे केबल्स कापण्यात आल्या आहेत. वाचा : चीनमध्ये दोन वर्षांतील उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद, धडकी भरवणारी आकडेवारी समोर कोरोनाचा प्रादुर्भाव आता संपल्यात जमा झाला आहे. अशा परिस्थितीत सर्वच कार्यालये, व्यापार पूर्वीप्रमाणे सुरळीत झाले आहेत. यामुळे मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्याही पूर्वप्रमाणेच झाली आहे. अशा परिस्थितीत आज सकाळी हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने त्याचा फटका चाकरमान्यांना बसल्याचं पहायला मिळालं. समाजकंटकांनी सिग्नल यंत्रणा आणि लोकेशन बॉक्स केबल्स तोडल्याने हा प्रकार घडला असल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणं आवश्यक आहे. कारण, वेळीच हा बिघाड लक्षात आला नसता तर मोठी दुर्घटनाही होण्याची शक्यता आहे.

  • IPL 2022 : 7 ओव्हरमध्येच मुंबईने गमावली मॅच, रोहितच्या टीमचा पराभवाचा ‘सिक्सर’

  • मोठी बातमी, अनिल देशमुख यांचा जामिनासाठी मार्ग मोकळा, न्यायालयात घडली महत्त्वाची घडामोड

  • नवनीत राणांचं शिवसैनिकांना ओपन चॅलेंज, “तुम्ही तारीख आणि वेळ सांगा, मी मातोश्रीवर येते”

  • 5 मिनिटांमुळे 5 वर्षांची प्रतीक्षा वाया? मेगा ब्लॅाकमुळे उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेला उशिरा पोहोचलेल्या पोलिसांना फटका 

  • Sanjay Raut vs MNS: “याची पुनरावृत्ती हवी का? तर मनसे स्टाईलने तुमचा भोंगा आम्ही बंद करु” राऊतांच्या विरोधात मनसेचे बॅनर

  • Mumbai Train Accident: रेल्वे अपघाताचा परिणाम; आज लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल

  • मुंबईत मोठी दुर्घटना, 2 एक्स्प्रेस गाड्या एकमेकांना धडकल्या, घटनास्थळाचा पहिला VIDEO

  • मोठी बातमी! दादर रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसचे तीन डब्बे रेल्वे रुळावरुन घसरले

  • ‘छेडोगे तो छोडेगे नही’, मुंब्र्यात पीएफआयचा मनसेला इशारा

  • Kirit Somaiya: नंदकिशोर चतुर्वेदी याच्या कंपन्यांची यादी जाहीर करत किरीट सोमय्यांचा थेट ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप

  • Thane Crime: सोसायटीच्या आवारात खेळल्याचा राग, वकिलाकडून 10 वर्षीय मुलाला बेदम मारहाण, घटना CCTV मध्ये कैद

  Published by:Sunil Desale

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Central railway, Mumbai

  Leave a Reply

  Your email address will not be published.