Home » मुंबई » 'डझनभर पवार लाईनमध्ये रडत होते, आता', अजितदादांबद्दल सोमय्यांचा नवा दावा

'डझनभर पवार लाईनमध्ये रडत होते, आता', अजितदादांबद्दल सोमय्यांचा नवा दावा

'डझनभर-पवार-लाईनमध्ये-रडत-होते,-आता',-अजितदादांबद्दल-सोमय्यांचा-नवा-दावा

मुंबई, 31 मार्च : महाविकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोपास्त्र सोडणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी (kirit somiya) पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अजित पवारांचा जरंडेश्वर कारखाना जप्त झाला आहे. डझनभर पवार लाईनमध्ये रडत होते. बेनामी संपत्ती प्रकरणी अजूनही अजित पवारांवर चौकशी सुरू’ असं वक्तव्य सोमय्यांनी केली. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘हसन मुश्रीफ आणि यशवंत जाधव यांच्यावर कारवाईचा प्रारंभ झाला आहे. यशवंत जाधव यांचे खाते मिळाले. त्यात वरिष्ठ अधिकारी आहेत.  तो पैसा वांद्रे इथं जाताना दिसतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आहे म्हणून पैसे लुटण्याचा अधिकार मिळतो असं नाही’ अशी टीका सोमय्यांनी केली. (बदली झालेलं सामान परत मिळवण्यासाठी जुगाड; पठ्ठ्याने IndiGo ची वेबसाईटच केली हॅक) ‘अजित पवारांचा जरंडेश्वर कारखाना जप्त झाला आहे. डझनभर पवार लाईनमध्ये रडत होते. बेनामी संपत्ती प्रकरणी अजूनही अजित पवारांवर चौकशी सुरू आहे, असा दावाही सोमय्यांनी केला. ‘वकील सतीश उके यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. उके महाराष्ट्राला लुटत होते. माफियागिरी करत आहे. ईडीनं सर्च केला कारवाई केली पण काहीतरी केलं म्हणून बाहेर येतंय. माझ्या विरोधात पण त्यांनी वकीलपत्र घेतलं होतं पण वकीलपत्रामुळे कोणावर कारवाई होत नाही. कारवाई होत असेल तर घोटाळा केला हे नक्की, अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी दिली. (कौतुकास्पद! 2 कर्णबधिर बहिणींची उत्तुंग झेप,IES परीक्षेत मिळवलं घवघवीत यश) ‘दोन दिवसांतच अनिल परब यांच्यावर कोर्टाने फौजदारी प्रक्रिया प्रारंभ केली आहे. लवकरच महाविकास आघाडीचे काही मंत्री तरुंगात जाणार आहे, असा दावाही सोमय्यांनी केला.

Published by:sachin Salve

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.