Home » मुंबई » एकतर्फी प्रेमातून आयटी इंजिनिअरची हद्द पार; मुंबईतील गायिकेला आणलं नाकीनऊ

एकतर्फी प्रेमातून आयटी इंजिनिअरची हद्द पार; मुंबईतील गायिकेला आणलं नाकीनऊ

एकतर्फी-प्रेमातून-आयटी-इंजिनिअरची-हद्द-पार;-मुंबईतील-गायिकेला-आणलं-नाकीनऊ

मुंबई, 28 मार्च: पेशानं आयटी इंजिनिअर असलेल्या एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून (One sided love) हद्द पार केली आहे. आरोपीनं मुंबईतील एका गायिकेवर पाळत ठेवणं, सोशल मीडियावर बदनामी करणं, अश्लील फोटो पाठवणं असे विविध प्रकार केले आहेत. मागील सहा वर्षांपासून आरोपी पीडित गायिकेला आणि तिच्या मॅनेजरला छळत (IT engineer molest female singer) होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर गायिकेच्या मॅनेजरनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी आयटी इंजिनिअरवर कारवाई केली आहे. विजयकांत मांडा असं अटक केलेल्या 34 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो मूळचा तामिळनाडूतील विशाखापट्टणम येथील रहिवासी असून आयटी इंजिनिअर (IT engineer) म्हणून कार्यरत आहे. मागील सहा वर्षांपासून आरोपी मुंबईतील 27 वर्षीय गायिका आणि तिच्या मॅनेजरला छळत आहे. आरोपीनं पीडित गायिकेच्या विविध मैफिल आणि कार्यक्रमांना हजेरी लावून तिला आणि तिच्या महिला मॅनेजरला त्रास दिला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पाठलाग करत गायिकेच्या घराच्या इमारतीच्या गेटवर येऊन थांबण्याचा धक्कादायक प्रकार देखील केला आहे. हेही वाचा-WhatsApp स्टेटसवरून झालेल्या वादाचा 2वर्षांनी घेतला बदला; शाळकरी मुलावर केले वार आरोपीचा वाढत चाललेल्या त्रासाला कंटाळून अखेर 17 मार्च रोजी मॅनेजरच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती देताना मॅनेजरनी सांगितलं की, आरोपी 2018 मध्ये गायिकेनं आयोजित केलेल्या एका स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर तो मुंबईतील ऑफिसला देखील आला. त्यामुळे तक्रारदार मॅनेजरनं गायिकेचा वैयक्तिक नंबर आरोपीला दिला होता. यानंतर आरोपीनं मॅनेजरला देखील सतत फोन करून गायिकेला भेटण्याबाबत चौकशी केली. पण गायिका व्यस्त असल्याचं सांगून मॅनेजरने त्याला अनेकदा टाळलं आहे. हेही वाचा-पुणे: पोलीस ऑफिसरची पत्नी अन् सासूचा राडा, महिलेला दगडाने जीवे मारण्याचा प्रयत्न 2019 मध्ये आरोपी विजयकांतने मुंबई, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद अशा विविध शहरात आयोजित केलेल्या गायिकेच्या कॉन्सर्टना हजेरी लावली होती.  तसेच तो चार वेगवेगळ्या नंबरवरुन मेसेज करुन तो गायिकेला त्रास दिल्याचं देखील मॅनेजरने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर, आरोपी विजयकांत आपल्या आईला घेऊन गायिकेच्या ऑफिसला आला होता. यावेळी त्यानं गायिकेकडं लग्नाची मागणी घातली होती. आरोपीचा हा त्रास वाढत गेल्यानं अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by:Maharashtra Maza News

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Crime news, Mumbai

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed